amitabh bachchan jaya bachchan
amitabh bachchan jaya bachchan esakal

लेकाच्या संसारात नाक खुपसणाऱ्या जया बच्चन स्वतःच्या सासू- सासऱ्यांसोबत कशा वागायच्या? अमिताभही गप्प पाहत बसायचे

Jaya Bachchan Bad Behaviour With Amitabh Bachchan's Parents: अमर सिंह यांनी जया बच्चन यांच्या वागण्याबद्दल केलेल्या त्या खुलाश्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Published on

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील दुराव्याच्या बातम्या येत आहेत. ते दोघे वेगळे राहत असल्याचं बोललं जातंय, मात्र त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. असं असताना याबद्दल बच्चन कुटुंबाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अशातच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या दुराव्याला सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता नंदा जबाबदार असल्याचं बोललं जातंय. मात्र बच्चन कुटुंबात हे पहिल्यांदा घडलं नाहीये. यापूर्वी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यातही दुरावा आला होता आणि याचं कारण जया यांचं अमिताभ बच्चन यांच्या आई वडिलांशी असलेलं नातं.

अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र अमर सिंह यांनी एका मुलाखतीत त्याच्याबद्दल काही खळबळजनक खुलासे केले होते ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. ३ जून १९७३ रोजी अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचे सासरे जया यांचे वडील या निर्णयावर नाखूष होते. आमचं संपूर्ण कुटुंब यामुळे उध्वस्त झालं असं ते हरिवंशराय यांना म्हणाले होते. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंह म्हणाले होते की, जया बच्चन १५ वर्ष त्यांच्या सासू सासर्यांसोबत वाईट वागल्या. जया अमिताभ त्यांच्यासमोरच हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांचा अपमान करायच्या.

मात्र सगळं दिसत असूनही अमिताभ काही बोलू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अमर हे अमिताभ यांना भेटले तेव्हा अमिताभ प्रतीक्षा बंगल्यात राहत होते तर जया जलसामध्ये राहत होत्या. जया सासू- सासऱ्यांसोबत खूप वाईट वागायच्या. अमिताभ यांना हे सहन झाले नाही आणि ते बांद्रा आणि नंतर दिल्लीतील गुलमोहर मार्गावरील घर 'सोपान'मध्ये राहू लागले. पण अमिताभ यांचे आई-वडील आजारी पडल्यावर त्यांनी त्यांना 'प्रतीक्षा' बंगल्यात पुन्हा नेलं. तिथेही जया बच्चन यांच्या सासू-सासऱ्यांसोबतच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.

अमर सिंह यांनी सांगितले होते की, जयाच्या वागण्यावर नाराज असल्याने त्यांनी तिला दुसरा बंगला 'जलसा' दिला, तर ते स्वतः 'प्रतीक्षा'मध्ये आई-वडिलांसोबत राहू लागले. जेव्हा अमर सिंह नंतर त्यांना भेटायला गेले तेव्हा अमिताभ आणि जया वेगळ्या घरात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळ्या घरात राहत होते.

amitabh bachchan jaya bachchan
BB Marathi Elimination: डीपीने सगळ्यांना टाकलं मागे; निकी-अरबाज नाही, याला मिळाली सगळ्यात कमी मतं; वाचा Voting trends

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...