सुरज चव्हाण नेमकं कुणाच्या सांगण्याप्रमाणे वागतोय? अंकिताच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, म्हणाले- त्याच्या आजूबाजूला

Ankita Walawalkar On Suraj Chavan Behaviour: 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर सुरज चव्हाण त्याच्या गावी गेला. त्यानंतर त्याच्या वागण्यात खूप बदल दिसून आला.
suraj chavan
suraj chavanesakal
Updated on

Entertainment News: छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचलेला रीलस्टार सुरज चव्हाण याने बिग बॉसच्या घरात सगळ्यांची मनं जिंकली. त्याने आपल्या वागण्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलंसं केलं. त्याला महाराष्ट्राने 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सीझनचा विजेता बनवलं. मात्र बिग बॉस संपल्यानंतर सुरजच्या वागण्यात खूप बदल दिसून आला असं कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिचं म्हणणं आहे. अंकिताने नुकतीच बारामतीला जात सुरजची भेट घेतली होती. मात्र तिथे अंकिता आणि तिच्या पाटील सुरजचा वेगळाच अनुभव आला. सुरज १ तासभर आपल्याला भेटायला आलाच नाही असं तिने सांगितलं. त्यानंतर तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आता नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको

सुरुवातीला अंकिता तिच्या होणाऱ्या पतीसोबत बारामतीला गेलेली. तिथले अनेक व्हिडिओ तिने सुरजसोबत शेअर केलेले. मात्र २ दिवसात ते डिलीट झाले. ही गोष्ट एका चाहत्याने अंकिताला सांगितली. त्यानंतर अंकिता 'थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद.' असं म्हणाली होती. आता अंकिताने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्याचा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे

यात ती म्हणाली, 'सूरज खूप भोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लोक या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. त्याचा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो, तिसरी व्यक्ती त्यावर व्हीडिओ एडिट करत असते.'

suraj chavan
सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.