Raj Thackeray: राज ठाकरेंवर चित्रपट येणार? तेजस्विनी पंडितच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण, कोण साकारतंय भूमिका?

Tejaswini Pandit Making Movie On Raj Thackeray Life: लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष लावले जात आहेत.
tejaswini pandit
tejaswini pandit esakal
Updated on

वर्षभरापूर्वी मराठीमध्ये स्त्रीप्रधान चित्रपट पाहायला मिळत होते. तर आता अनेक नवीन विषयावरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातच 'धर्मवीर २', 'नवरा माझा नवसाचा २' हे चित्रपट रिलीज होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत बायोपिकलाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसतो. आता त्यात एका लोकप्रिय नेत्याच्या बायोपिकची भर पडणार असल्याचं दिसतंय. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिक नंतर आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याला कारण ठरलेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे फोटो. तेजस्विनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत ज्यावरून या चर्चा रंगल्या आहेत.

tejaswini pandit
tejaswini pandit esakal

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही अभिनेत्रीसोबतच निर्माती आणि दिग्दर्शिकाही आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. आता ती राज ठाकरे यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत असल्याचं बोललं जातंय. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्रीसोबत दिसत आहेत. पांढरा सदरा, डोळ्याला गॉगल तशीच हेअरस्टाइल असणारा एक व्यक्ती तेजस्विनीसोबत आहे आणि ती त्यांच्या लूकचं निरीक्षण करताना दिसतेय. आता हा व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

tejaswini pandit
tejaswini pandit esakal

चित्रपट नेमका काय असणार? कोण कलाकार असणार? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती- तेजस्विनी पंडितची भूमिका यापैकी नेमकी कोणती? राज ठाकरे यांची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारतोय असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच पण जर खरंच राज यांच्या आयुष्यावरील चित्रपट आला तर प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

tejaswini pandit
Bigg Boss Marathi ५: मी कोणाला सोडत नाय! कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज- निक्कीशी भिडला सुरज; एकेकाला दाखवली त्यांची जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.