Imran Khan : 'जाने तू या जाने ना' ला १६ वर्षे पूर्ण, कलाकारांनी केली ही खास गोष्ट

Jaane Tu Ya Jaane Na Movie Cast Revisit: "तेरा मुझसे है..." आठवणीत इमरान आणि जिनीलियाने गायलं गाणं
jaane tu ya jaane na
jaane tu ya jaane na sakal
Updated on

'जाने तू या जाने ना' या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं. कॉलेजातील तरुण पिढी तर या चित्रपटाची गाणी गुणगुणू लागली होती. या चित्रपटांच्या गाण्यांवर नाचू लागली होती. म्हणूनच या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. ४ जुलै रोजी या चित्रपटाला तब्बल १६ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी खास गोष्ट केलीय.

'जाने तू या जाने ना' या चित्रपटात अभिनेता इमरान खान आणि जिनीलिया डिसूजा ही जोडी झळकली होती. अभिनेता आमिर खानचा भाचा इमरानने याच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इमरान खान त्यानंतर मुलींचा क्रश बनला होता. शिवाय जिनीलियाच्या क्युट अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आमिर खान प्रोडक्शनच्या या चित्रपटाला १६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करण्यात आलाय.

आमिर खान प्रॉडक्शनच्या सोशल मिडिया पेजवर एक रील व्हिडिओ शेयर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये इमरान खान, जिनीलिया सह इतरही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांना एकत्र पाहुन चित्रपटाच्या आठवणी जाग्या होताना दिसत आहेत. या व्हिडिओत इमरान, जिनीलियासह इतर कलाकार तेरा मुझसे है पहले का नाता कोई हे गाणं गात आहेत. या चित्रपटाचं आणि या गाण्याचं खास नातं आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये चित्रपटाला हिरो इमरान हा हिरॉईन जेनेलियासाठी हे गाणं एअरपोर्टवर गाताना दिसतो.

हा क्लायमॅक्स सीन या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. शिवाय या चित्रपटाच्या चाहत्यांचा हा आवडता सीन देखील आहे. याच सीनमधील हे जुनं गाणं पुन्हा एकदा गुणगुणताना हे कलाकार दिसलेत. इमरान आणि जिनीलियासह या व्हिडीओत सुगंधा, मंजरी फडनीस, अलिश्का और करण मखीजा हे कलाकार पाहायला मिळत आहेत. 'कभी कभी आदिती', 'पप्पू कान्ट डान्स', 'नझरे मिलाना' या चित्रपटातील ही गाणी लोकप्रिय ठरली होती.

मात्र या सगळ्या कलाकारांचं एकत्र रियुनियन होणार की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर इमरान खानने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्राला राम राम केलाय. सध्या इमरान खानच्या कमबॅकची जोरदार चर्चा असतानाच हा व्हिडिओ समोर आलाय. मात्र चाहते अजूनही त्याला पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत. तर जिनीलिया देखील लग्नानंतर काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिली. वेड या मराठी चित्रपटातून तिने पती रितेश देशमुखसोबत काम केलं.

jaane tu ya jaane na
Justin Bieber: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्यासाठी आलेल्या जस्टिन बिबरने मुंबईत उतरताच सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com