फिरायला जायला यांच्याकडे पैसे आहेत पण... जॅकी भगनानीने थकवले क्रू मेंबर्सचे पगार, महिलेचा धक्कादायक दावा

Jackky Bhagnani Production House: लोकप्रिय अभिनेता जॅकी भगनानी याच्या प्रोडक्शन हाउसवर अनेकांचे पगार थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
jackky bhagnani fraud
jackky bhagnani fraud sakal

Jackky Bhagnani: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी याने काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. आता जॅकी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या प्रोडक्शन हाउसवर अनेकांचे पगार थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने पोस्ट करत जॅकीच्या 'पूजा एंटरटेनमेंट'ने अनेक महिने आपले पैसे दिले नसल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आणखीही काही नेटकऱ्यांनी आपलेही पैसे अडकले असल्याचं सांगितलं आहे.

जॅकी भगनानीच्या पूजा एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने एक मोठी पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला. तिने लिहिलं, तिला तिच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागल्या मात्र तरीही तिचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांना सांगण्यात आलं होतं की ४५ ते ६० दिवसात त्यांचे पैसे मिळतील मात्र तसं झालं नाही.

तर दुसऱ्या युझरनेदेखील आपला अनुभव सांगत लिहिलं, 'मी दोन वर्षांपूर्वी या प्रोडक्शन हाउसबरोबर काम केलं होतं. १०० क्रू मेंबर्स होते. २ महिन्यांच्या पगारासाठी आम्ही २ वर्ष झाले तरी वाट पाहतोय. कलाकारांना त्यांचे पैसे ताबडतोब मिळतात कारण ते कलाकार आहेत. पण आम्ही वाट बघत बसतो. त्यांच्याकडे फिरायला जायला पैसे असतात, बिझनेस क्लासने प्रवास करायला पैसे असतात महागड्या गाड्या घ्यायला पैसे असतात पण आमचे पैसे द्यायच्या वेळेला त्यांच्याकडे अडचण सुरू असते. ते स्वतःवर खूप पैसे खर्च करू शकतात पण आमच्या मेहनतीचे पैसे मात्र देणार नाहीत.'

एकापाठोपाठ अनेक जणांनी अशा पोस्ट केल्या आहेत. पूजा एंटरटेनमेंट ही कंपनी वसू भगनानी यांनी सुरू केली होती. त्यांचा शेवटचा चित्रपट अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'छोटे मिया बडे मिया' होता. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

jackky bhagnani fraud
आणि ते अमरीश पुरींचे शेवटचे शब्द ठरले! मृत्यूपूर्वी मुलाला म्हणालेले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com