इतकं घाण बोलतायत की... जान्हवीचे ट्रोलर्स मुलावर काढतायत राग; अभिनेत्रीच्या पतीने जोडले हात, म्हणाले- त्याला ताप

Bigg Boss Marathi Fame Jahnavi Killekar Son Targeted By Users: जान्हवीचे पती किरण किल्लेदार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मुलाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं आहे.
jahnavi killekar
jahnavi killekaresakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजतोय. पहिल्या तीन आठवड्यात सगळ्यांशीच पंगा घेऊन नजरेत येणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. तिने तिच्यावागण्याने सगळ्यांचा रोष ओढवून घेतला. तिला जेलमध्येही टाकण्यात आलं. तिच्या वागणुकीसाठी तिला सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केलं जातंय. मात्र हे ट्रोलिंग फक्त तिच्यापर्यंत येऊन थांबत नाहीये. या सगळ्यात नेटकरी तिच्या मुलापर्यंत पोहोचलेत. त्यालाही सोशल मीडियावर घाण घाण ऐकवलं जातंय. आता या प्रकरणी जान्हवीच्या पतीने भाष्य केलं आहे.

इशानचं आहे इंस्टाग्राम अकाऊंट

जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'इशान खूप लहान आहे. तो फक्त ८ वर्षांचा आहे. त्याला जान्हवीने सांगून ठेवलेलं की शाळेत आई बिग बॉसमध्ये जातेय हे सांगायचं नाही. तो ज्या शाळेत जातो तिथे सगळ्यांना माहितीये की, इशानची आई बिग बॉसमध्ये आहे. पण कोणी त्याला काही बोलत नाही. फक्त इशानचं इन्स्टाग्रामवर जे अकाऊंट आहे तिथे लोक त्याला घाण बोलत असतात. इशानला जान्हवीने मोबाईल घेऊन दिलाय. तो कुठे मित्रांसोबत खेळायला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जातो. त्यामुळे त्याच्याकडे मोबाईल असावा म्हणून.'

अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

ते पुढे म्हणाले, 'त्यादिवशी तो इंस्टाग्रामवरचा मेसेज दाखवण्यासाठी आला. बाबा हे बघ. एवढं घाण घाण बोलतात त्याला. माझं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला बोला पण त्याला नका बोला. एक किस्सा असा घडला की, जान्हवी-आर्याचं भांडणं झालं होतं. इशानला ताप भरलेला. तो मांडीवर झोपून बिग बॉस बघत होता. त्यावेळी रितेश देशमुख म्हणाला की, इशान आपल्या सर्वांचा आहे. हे ऐकताच तो पटकन उठला. त्याला आम्ही सांगितलं की, आर्या तुझ्या मम्माला बोलली. तेव्हा त्याने विचारलं की, मम्माने तिला मारलं का? आम्ही म्हटलं नाही. कारण ती सॉरी म्हणाली. मग इशानने हुश्श केलं. कारण त्याला माहितीये की, इशानला कोणी काही बोललं त्याची मम्मा कोणाचं ऐकत नाही.' जान्हवीच्या वागण्यासाठी तिच्या मुलाला आणि कुटुंबाला टारगेट केलं जातंय त्यामुळे तिच्या पतीने किमान त्यांच्या मुलाला यापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे.

jahnavi killekar
Sarkata In Kalki: अमिताभ यांच्या 'कल्की'मध्ये दिसलाय 'स्त्री २' चा सरकटा; तुम्ही ओळखलात का? शेअर केला खास फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.