Yed Lagla Premacha: जय दुधाणेने दोन महिन्यात का सोडली 'येड लागलं प्रेमाचं' मालिका? स्वतः सांगितलं कारण, म्हणतो- माझ्यासाठी...

Jay Dhudhane On Yed Lagla Premacha Marathi Serial: लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे याने दोन महिन्यात स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचा निरोप घेतला आहे.
jay dhudhane
jay dhudhanesakal
Updated on

Jay Dhudhane On Yed Lagla Premacha Marathi Serial: छोट्या पडद्यावरील मालिका या नेहमीच प्रेक्षकांच्या जवळच्या असतात. या मालिकांमधील कलाकारही त्यांना आपल्याच घरातील सदस्य वाटतात. त्यामुळे मालिकेत दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच स्टार प्रवाहवर नुकत्याच काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यातील एक म्हणजे 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका. या मालिकेत अभिनेता विशाल निकम, अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता जय दुधाणे मुख्य भूमिकेत दिसत होते. मात्र अवघ्या २ महिन्यात जयने या मालिकेचा निरोप घेतला. आता त्याने या यामागचं कारण सांगितलं आहे.

जय आणि विशाल यांनी 'बिग बॉस मराठी ३' मध्ये राडा केला होता. त्यामुळे त्यांना मालिकेत एकत्र पाहून चाहते आनंदी झाले होते. मात्र आता त्याने मालिकेचा निरोप घेतला. त्याने एक स्टोरी शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. जयने आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे हा निर्णय घेतला असं त्याने सांगितलं आहे. एक स्टोरी पोस्ट करत जयने लिहिलं, 'मी एका महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना गमावलं. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप मोठा मी=धक्का होता. आमचं खूप मोठं नुकसान झालंय. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे मी यापुढे स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करू शकणार नाही.'

jay dudhane
jay dudhane esakal

त्याने पुढे लिहिलं, 'या संपूर्ण कास्ट आणि चॅनेलसोबत काम करण्याचा हा अनुभव अतिशय सुंदर होता. तुम्ही या मालिकेवर असंच प्रेम करत राहाल अशी अपेक्षा. माझ्याकडून मालिकेला खूप खूप शुभेच्छा.' अशी पोस्ट करत त्याने चाहत्यांना त्याचं कारण सांगितलं आहे. त्याने मालिका का सोडली याबद्दल अनेक चर्चा रंगण्यापूर्वीच त्याने आपलं कारण सांगितलं आहे. जयला 'बिग बॉस मराठी ३'मधून लोकप्रियता मिळाली होती. तो महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात दिसणार आहे. मात्र या चित्रपटाबद्दल कोणतीही पुढील अपडेट समोर आलेली नाही. तर जयच्या वडिलांचं जून महिन्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तो अजूनही या धक्यातून सावरू शकलेला नाही.

jay dhudhane
Salman Khan: सलमान खानने साजरा केला कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरचा वाढदिवस, दोघांचा कोझी फोटो व्हायरल, चर्चेला उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com