जिनिलियाने शेअर केला मुलांचा फोटो पण नेटकऱ्यांना खटकली ती गोष्ट; थेट केली शाळेची चौकशी, म्हणतात-

Riteish Deshmukh Kids: लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे चर्चेत असला तरी त्याची मुलं सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
genelia  Deshmukh
genelia Deshmukh esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने तर चाहत्यांचं मन जिंकलंच सोबतच त्यांचं वागणंही नेटकऱ्यांच्या कौतुकाला पात्र ठरतं. जी गोष्ट आईवडिलांची तिचं मुलांची. जिनिलिया आणि रितेशने त्यांच्यावर केलेल्या संस्कारांचं कायमच कौतुक होतं. जिनिलिया आणि रितेश यांची मुलं नेहमी पापाराझींना पाहून हात जोडतात. तर जिनिलिया अनेकदा त्यांचा घरात अभ्यास करतानाचा आणि खेळतानाचा व्हिडिओ शेअर करताना दिसते. मात्र आता त्यांचा एक फोटो पाहून नेटकऱ्यांना एक भलताच प्रश्न पडला आहे.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जिनिलियाने मुलांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो दोघेही आपल्या आजोबांच्या समोर बसून त्यांच्या फोटोला वंदन करताना दिसतायत. हा फोटो पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही हा फोटो बराच व्हायरल झाला. मात्र अशातच काही नेटकऱ्यांना या फोटोतली एक गोष्ट खटकली. ती म्हणजे मुलाचे केस. त्या दोघांचे केस पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांच्या शाळेची चौकशी केली. ही कोणती शाळा आहे जी अशा केसांसह मुलांना शाळेत येण्याची परवानगी देते असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे.

riteish deshmukh kids
riteish deshmukh kids esakal

त्यावर इतरही काही नेटकऱ्यांनी आपल्यालाही हाच प्रश्न पडला होता असं म्हणत त्या प्रश्नाला दुजोरा दिला. या प्रश्नावर उत्तर देत एकाने रितेशची स्वतःची शाळा आहे जी त्यांच्या घरापासून जवळ आहे असं सांगितलं आहे. तर एकाने ही धीरूभाई अंबानींची शाळा आहे का? अशी विचारणा केली आहे. दुसरीकडे रितेश सध्या 'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसतो आहे. त्याची होस्टिंग प्रेक्षकांना आवडते आहे.

genelia  Deshmukh
BB Marathi Online Trp: ऑनलाइन टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५'चा जलवा, मालिकांना मागे टाकत पटकावलं 'हे' स्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.