Upendra Limaye : काय सांगता! अभिनेता उपेंद्र लिमये मिरवणुकीत वाजवतोय ताशा? हा व्हिडिओ पाहून नेटकरीही झिंगले

Upendra Limaye At Ganpati Visarjan: लोकप्रिय मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
upendra limaye
upendra limaye esakal
Updated on

सगळ्यांच्या लाडक्या गणरायाने १७ सप्टेंबर रोजी भक्तांचा निरोप घेतला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सगळीकडेच मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पा जाताना भाविकांना पुढील वर्षी लवकर येण्याचं वचन देऊन गेला. भाविकांनी साश्रू नयनांनी, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. या विसर्जन मिरवणुकीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही व्हिडिओ आहे जो गुलालाचा माखलाय आणि चक्क ताशा वाजवतोय. हा अभिनेता आहे उपेंद्र लिमये. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

उपेंद्र लिमये यांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला हजेरी लावली. त्या विसर्जनादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ स्वतः उपेंद्र यांनीच शेअर केला आहे. यात अभिनेता वेगवेगळ्या गणेश मुर्त्यांचं दर्शन घेताना दिसतोय. त्यानंतर एक व्यक्ती त्यांना गुलालाने माखवताना दिसतायत. आणि उपेंद्र तो गुलाल झाडतात आणि स्वतः ताशा वाजवायला सुरुवात करतात. त्यांच्या ताशाला पुढे ढोलाचीही साथ मिळते. उपेंद्र यांच्या या ताशाच्या तालावर तिथले अनेक भाविक डुलताना दिसतायत. त्यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना पसंत पडला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, ''पुण्यातील मिरवणुकीत गुलालाच्या आणि ताशाचा गाजरात गणपती बाप्पाला निरोप! गणपती बाप्पा मोरया'. उपेंद्रचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना भावला असून अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलं, 'काय अंदाज आहे भाई एक नंबर' दुसऱ्याने लिहिलं, 'तुम्ही खर्च ताशा वाजवताय आमचा विश्वास बसत नाहीये.' तिसऱ्याने लिहिलं, 'वाह वाह तुमचं हे रूप पाहून मी तर चकीतच झालो.' उपेंद्र लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

upendra limaye
Salim Khan Death Threats: लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या? सलमाननंतर आता वडील सलीम खान यांना धमकी; बाइकवरून आला अन्

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.