या आठवड्यात अनेकांना दिवाळीची सलग सुट्टी आहे. त्यामुळे घरबसल्या या सुट्ट्या मुळीच वाया घालवू नका. फावल्या वेळेत या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सीरिज आणि चित्रपट पाहा. या आठवड्यातही ओटीटीवर धमाकेदार ऍक्शनपॅट आणि क्राइम थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
'तंगलान' हा दाक्षिणात्य चित्रपट या दिवाळीत ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाची कथा कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्डमध्ये असलेल्या खाण कामगारांच्या जीवनाभोवती फिरते. यात विक्रम, पार्वती थिरुवोथू, मालविका मोहनन, डॅनियल कॅलटागिरोन आणि पशुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तो 31 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
'जोकर: फोली ए ड्यूक्स'ची कथा एका अयशस्वी कॉमेडियनभोवती फिरते जो दुहेरी ओळख घेऊन फिरतोय, परंतु प्रेमात पडल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं. या चित्रपटात लेडी गागा, जोक्विन फिनिक्स, झॅझी बीट्झ, हॅरी लॉटी, जेकब लोफ्लँड, ब्रेंडन ग्लीसन आणि टिम डिलन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 29 ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडिओवर रेंटवर उपलब्ध होईल.
'मिथ्या 2'ची कथा जुहू आणि रिया नावाच्या दोन बहिणींभोवती फिरते. एक यशस्वी लेखिका झाल्यानंतर जुहीने तिच्या स्टारडमचा आनंद घेतला, परंतु दुसऱ्या लेखकाने तिच्यावर चोरीचा आरोप लावल्यानंतर तिला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. दरम्यान, त्याची बहीण रिया या परिस्थितीचा फायदा घेते आणि वाईट हेतूने तिच्या वडिलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी, अवंतिका दासानी, रजित कपूर, इंद्रनील सेनगुप्ता, अवंतिका आकेरकर, रुशद राणा आणि कृष्णा बिश्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज 1 नोव्हेंबर रोजी ZEE5 वर रिलीज होईल.
'किष्किंधा कांडम' ही कथा नवविवाहित जोडपं आणि वन अधिकारी यांच्याभोवती फिरते जे गावात माकडांमुळे होणाऱ्या त्रासामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आसिफ अली, विजयराघवन आणि अपर्णा बालमुरली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.