Bhushan Pradhan: मुलगा असावा तर असा! भूषण प्रधानने आई- वडिलांसाठी घेतलं नवं घर; म्हणाला- गेले सहा महिने मी...

Bhushan Pradhan New Home: लोकप्रिय मराठी अभिनेताभूषण प्रधान याने आई वडिलांना नवं घर भेट केलं आहे. त्याने घराचे काही फोटोही शेअर केले आहेत.
bhushan pradhan
bhushan pradhan esakal
Updated on

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये भूषणचं नाव घेतलं जातं. नुकताच त्याचा 'घरात गणपती' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भूषण सोशल मीडियावरही सक्रीय असतो. तो कायम आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. आता भूषणने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. त्याने त्याच्या आईवडिलांसाठी नवं घर खरेदी केलं आहे. यानिमित्ताने त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने ही गुडन्यूज एक पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भूषणने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या नव्या घराची झलक शेअर केली आहे. सोबतच या फोटोंमध्ये त्याचे आई-वडील देखील आहेत. भूषणने हे घर त्याच्या आईवडिलांना भेट म्हणून दिलं आहे. भूषणचं हे नवं घर पुण्यात आहे. हे फोटो शेअर करत त्याने लैहिल,'मागचे ६ महिने माझ्यासाठी खूप खास होते. 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' या माझ्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 'जुनं फर्निचर' सिनेमाने आपल्या आईवडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे, याची आठवण करून दिली. 'घरत गणपती' सिनेमाने एकत्र कुटुंबाची सुंदरता दाखवली.'

त्याने पुढे लिहिलं, 'आता गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर मला माझं पूर्ण झालेलं स्वप्न शेअर करायचं आहे. माझ्या आईवडिलांसाठी मी नवीन घर खरेदी करू शकलो. हे घर म्हणजे त्यांचं माझ्यासाठी असलेलं प्रेम, आदर आणि त्यांनी कित्येक वर्षांपासून माझ्यासाठी केलेला त्याग आहे.' भूषणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटकरात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनीदेखील त्याचं अभिनंदन केलं आहे.

bhushan pradhan
गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले दीपिका- रणवीर; होणाऱ्या बाळाच्या आजी-आजोबांचीही हजेरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.