जस्टिन बीबर बाबा झाला; गायकाच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन; पोस्ट करत नावही सांगितलं

Justin Bieber Became Father : लोकप्रिय पॉप सिंगर जस्टिन बीबर बाबा झाला आहे. त्याने आपल्या नवजात बाळाचा फोटो शेअर करत नाव सांगितलं आहे.
justin bieber
justin bieber esakal
Updated on

जगभरात लोकप्रिय असलेला पॉप सिंगर जस्टिन बीबर आणि मॉडेल हेली बीबर अखेर आई-वडील झाले आहेत. त्यांच्या घरात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गायकाच्या पत्नीने हेलीने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याची माहिती त्याने स्वतः इंस्टाग्रामवर दिली आहे. त्याने त्याच्या बाळाची एक झलकदेखील चाहत्यांसोबत शेअर केली आणि यासोबतच आपल्या बाळाचं नावही सांगितलं आहे. 24 ऑगस्ट रोजी, त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. या पोस्टवर आता चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्नाच्या ६ वर्षानंतर जस्टिन बाबा झाला आहे. त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी, जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या त्याच्या चिमुकल्या राजकुमाराच्या पायांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'जॅक ब्लूज बीबरच्या घरी स्वागत आहे.' जस्टिनने त्याच्या बाळाचं नाव जॅक ठेवलं आहे. हेलीनेदेखील काही वेळातच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर देखील ही पोस्ट शेअर केली, त्यात बाळाचं नाव आणि टेडी बेअरसह निळ्या हार्ट इमोजी आहेत.

जस्टिन बीबरने हेलीच्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावर दिली होती, त्यानंतर तो सतत चर्चेत होता. यावर्षी तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये त्यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता, ज्याच्या क्लिप व्हायरल झाल्या. तो म्युझिक इंडस्ट्रीतआल्यापासून प्रत्येकजण त्याच्या आवाजाचा वेडा आहे.

आता या छोट्या पाहुण्याच्या घरी आल्याची आनंदाची बातमी ऐकून सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत. फोटोग्राफर डब्बू रत्नानी आणि अभिनेत्री स्मृती खन्ना यांनी अभिनंदन केले आहे. जस्टिन 'द एलेन शो'मध्ये म्हणाला होता, 'हेलीला हवी तितकी मुलं मला होतील.' मी माझा स्वतःचा ग्रुप तयार करेन. मला असं वाटतं की शरीर तिचं आहे आणि ती तिला पाहिजे ते करू शकते. त्याचवेळी, हेलीने 'संडे टाइम्स'शी बोलताना सांगितलं होतं की, तिला मुलाला जन्म देण्याची 'भीती'वाटते. मात्र आता त्यांच्या आयुष्यात अखेर एका तिसऱ्याची एंट्री झाली आहे. .

justin bieber
कोलकाता येथे लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला; भेदरलेल्या अवस्थेत व्हिडीओ केला शेअर; म्हणते- हेच जर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.