Kalki 2898 Box Office: बॉक्स ऑफिसवर प्रभासचं वादळ, रविवारी 'कल्की'च्या कमाईत तुफान वाढ; वाचा एकूण कलेक्शन

Kalki 2898 Ad Total Box Office: लोकप्रिय अभिनेता प्रभास याच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने बजेटच्या अर्धी कमाई केली आहे.
kalki box office
kalki box office

Kalki 2898 AD Box Office Collection Day 4: दिग्दर्शक नाग अश्विन याच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता प्रभास, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेते कमल हासन यांच्या अभिनयाने सज्ज असलेला 'कल्की २८९८ एडी' प्रदर्शनापूर्वीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या चार दिवसात या चित्रपटाची कमाई फक्त वाढताना दिसतेय. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. आता रविवारी बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडला आहे. वाचा चित्रपटाने एकूण किती कमाई केली आहे.

सॅकनीक या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासच्या 'कल्की'ने चार दिवसात बजेटच्या अर्धी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ९५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५७ कोटींची कमाई केलेली. दुसऱ्या दिवशी कमी कमाई झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ६७ कोटी कमावले होते. आता रविवारी पुन्हा कमाईच्या आकड्यामध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटाने रविवारी म्हणजेच चौथ्यादिवशी ८३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चार दिवसातच हा चित्रपट ३०० कोटींच्या वर गेला आहे. या चित्रपटाचं बजेट ६०० कोटी आहे.

तर संपूर्ण जगभरात 'कल्की'ने ४१५ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाने कमाल कामगिरी केली आहे. प्रभासच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडला असला तरी काही प्रेक्षक या चित्रपटाला नावं ठेवताना दिसत आहेत. मात्र असं असलं तरी प्रेक्षकांची थिएटरमधील वाढणारी संख्या पाहून हा चित्रपट लवकरच ६०० कोटींची कमाई करेल असा अंदाज लावण्यात येतोय. आता 'कल्की' इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

kalki box office
Rupali Bhosale: म्हणून नव्या घराच्या नेमप्लेटवर नाहीये रुपाली भोसलेचं नाव; कारण सांगत म्हणते- कागदपत्र जरी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com