Kalki 2898 AD Twitter Review: प्रभासची एंट्री दमदार पण भाव खाऊन गेले अमिताभ; कसा आहे 'कल्की २८९८'? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Kalki 2898 AD Released: आज २७ जून रोजी प्रभासचा 'कल्की २८९८' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. वाचा कसा हा चित्रपट.
kalki 2989 Ad
kalki 2989 Ad sakal

Kalki 2898 Review: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोणयांचा 'कल्की २९८९ आज २७ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या काही वेळातच या चित्रपटाचा ट्विटर रिव्ह्यू समोर आला आहे. नेटकरी त्यांना हा चित्रपट कसा वाटलं याबद्दल ट्विटरवर भरभरून बोलताना दिसत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. कल्की एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नेटकऱ्यांच्या मते हा चित्रपट इतका चांगला आहे की एकदा तरी मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवा.

वाचा काय म्हणाले नेटकरी?

वेंकी रिव्ह्यू नावाच्या एका नेटकऱ्याने रिव्ह्यू देत लिहिलं की हा चित्रपट आपल्याला लार्जन दॅन लाईफ सायन्स फिक्शनचा अनुभव देणारा आहे. पण हा चित्रपट ड्रामा आणि इमोशनल कनेक्ट दाखवण्यात कमी पडलाय. तर चित्रपटाचा स्क्रीनप्लेदेखील सपाट आहे पण यात लिहिलं गेलंय की चित्रपटात कमी असली तरी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट एकदातरी पाहिलाच पाहिजे.'

प्रभासचा पावरहाऊस अभिनय

रिया चौधरीने ट्वीट करत लिहिलं, 'हा चित्रपट इंडियन सिनेमामध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करतोय. प्रभासने या चित्रपटात एकदम दमदार अभिनय केला आहे.' रामा नावाच्या युझरने लिहिलंय, 'हा चित्रपटात 'ब्लेड रनर' आणि 'मॅड मॅक्स' चा थोडासा टच आहे. तर प्रभास आणि अमिताभ यांच्यातील फायटिंग सीनदेखील एपिक असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याने दीपिका आणि दिशा यांच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं आहे.

एकदा तर पाहायलाच हवा

सिनीमेनिया इंडियाने चित्रपटाच्या व्हिज्युअल्सचं कौतुक केलं आहे. कुरुक्षेत्राचे दाखवलेले सीन उत्तम आहेत तर प्रभासच्या एंट्रीचं कौतुक झालं आहे. कमल हासन यांच्या मेकओव्हरचं देखील खूप चांगलं जमलं आहे. इथेही चित्रपटाच्या स्क्रीनप्लेचं कौतुक करण्यात आलेलं नाही. तर चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे असं या नेटकऱ्याचं देखील म्हणणं आहे.

तर प्रभासचे चाहते चक्क जपानहून त्याचा चित्रपट पाहण्यासाठी भारतात आले. त्यांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे हे मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com