Paris Olympics: खेळाचा सेक्सशी काय संबंध? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धर्माचा अपमान पाहून चढला कंगनाचा पारा; म्हणाली- बेडरूमपर्यंत

Kangana Ranaut On Paris Olympics: २६जुलै पासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धर्माचा अपमान करण्यात आला आहे. त्यावरून कंगना रणौतने रोष व्यक्त केला आहे.
kangana ranaut
kangana ranaut esakal
Updated on

सध्या सगळीकडे पॅरिस ऑलिंपिक्सची चर्चा आहे. यावर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्स देशातल्या परिसमध्ये होत आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी येतात. काल २६ जुलै रोजी या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मोठ्या उत्साहात या स्पर्धेचा आरंभ करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाच्या वेळेस असं काही घडलं जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. फ्रान्सने केलेल्या या कृतीने सोशल मीडियावर प्रचंड नाराजी आहे. तर अभिनेत्री कंगना रणौत देखील याबद्दल व्यक्त झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. वाचा नेमकं काय घडलंय?

paris olympic 2024
paris olympic 2024esakal

यावर्षीचं ऑलिम्पिक हे होमोसेक्शुअल व्यक्तींच्या समर्थनाचं प्रतीक आहे. मात्र त्यांचं समर्थन करताना ओपनिंग सेरेमनीमध्ये काही व्यक्ती दाखवण्यात आल्या होत्या. यात एक व्यक्ती नग्न येशू ख्रिस्त बनला होता. ज्याच्या संपूर्ण अंगावर निळा रंग फासण्यात आला होता. तर एक स्त्री आपलं कापलेलं मुंडकं घेऊन बसली आहे. तर त्यांच्या लैंगिकता दाखवण्याच्या फ्रेममध्ये अनेक स्त्रियांसोबत एका लहान मुलीचाही समावेश करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणावर कंगनाने संताप व्यक्त केला आहे.

paris olympic 2024
paris olympic 2024

तिने एक पोस्ट स्टोरी शेअर करत लिहिलं, 'यावर्षीचं ऑलिम्पिक पूर्णपणे ख्रिश्चन धर्मातील डाव्यांनी आपल्या हातात घेतलं आहे. हायपर सेक्शुऍलिटी दाखवण्याच्या फ्रेममध्ये एक लहान मुलगी स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर त्यांनी एक नग्न अवस्थेतील ख्रिस्तदेखील दाखवला आहे. अशा प्रकारे फ्रान्स त्यांच्या जगभरातील पाहुण्यांचं स्वागत करत आहे? आणि अशा गोष्टींमधून त्यांना जगाला काय संदेश द्यायचाय? सैतानाच्या जगात तुमचं स्वागत आहे हा?'

paris olympic 2024
paris olympic 2024esakal

तिने पुढे लिहिलं, 'मी होमोसेक्शुऍलिटीच्या विरोधात मुळीच नाही. पण मला हेच कळत नाहीये की ऑलिम्पिक हे कोणत्याही लिंगाशी कसं जोडलेलं आहे? का खेळात सर्व राष्ट्रांचा सहभाग आहे. पण मानवी मूल्य सेक्सच्या वरचढ का ठरत आहेत? सेक्स तुमच्या बेडरूमपर्यंतच मर्यादित का राहू शकत नाही? ती देशाची ओळख होणं गरजेचं आहे का? हे खूप भयंकर आहे.' असं लिहीत कंगनाने तिचा राग व्यक्त केला आहे.

kangana ranaut
Mamta Kulkarni: ड्रग्स केसमध्ये ममता कुलकर्णीला मोठा दिलासा; पुराव्यांअभावी न्यायालयाकडून क्लीनचिट, नवराच होता मास्टरमाइंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.