बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिची मतं परखडपणे मांडते. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता ती हिमाचल प्रदेश येथील मंडीची खासदार आहे. ती एक राजकारणी म्हणूनही सक्रिय असते. मात्र राजकारणात पडल्यानंतर तिला अनेक गोष्टी माहीत पडल्या ज्या तिने एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. राजकारणी लोकांची मैत्री खूप वेगळी असते. तुम्हाला टीव्हीवर जे दिसतं ते पूर्णपणे खरं नसतं, विधानसभेत भांडणारे हे लोक सभा संपताच एकमेकांचे मित्र होतात, असं ती म्हणाली आहे.
कंगनाने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या पॉडकास्टमध्ये तिला राजकारणी लोकांच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं. नेत्यांपैकी कुणी तुझे मित्र आहेत का असा प्रश्न विचारल्यावर कंगना म्हणाली, 'नेत्यांची मैत्री तर खूप विचित्र आहे. मी हे बघून सगळ्यात जास्त शॉक झाली की जेव्हा ते सगळे विधानसभेत असतात. ते एकमेकांशी भांडत असतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते समोरच्याला सुनावत असतात. तेव्हा ते आपल्या माणसांसाठी भांडत असतात. कुणाला आपल्या भागात काय हवं असतं, त्यासाठी भांडत असतात. पण जसे तिथून बाहेर पडतात त्या सभागृहातून जसे ते बाहेर येतात कँटीनमध्ये बघाल तर सगळं चित्र पूर्णपणे बदललेलं असतं.'
ती पुढे म्हणाली, 'सगळे जोरजोरात हसत असतात, एकमेकांसोबत खात असतात. बोलत असतात. सगळे मित्र असतात. ते अतिशय शांत असतात आणि आरामात असतात. विरोधकवगरे काही नसतं. मस्त खात असतात गप्पा मारत असतात. हसत असतात. ते एकत्र पार्टीसुद्धा करतात. किती निमंत्रण तर मलाही येतात पार्टीमध्ये येण्यासाठी विरोधकांकडून. माझेही खूप मित्र आहेत विरोधी पार्टीमध्ये.' तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.