'तुंबाड' ते 'रहना है तेरे दिल मे'; थिएटरमध्ये का प्रदर्शित होतायत जुने चित्रपट? हे आहे कारण

Why Movies Are Rereleasing In Theatres: ३० ऑगस्ट रोजी काही चित्रपट पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. मात्र त्यामागचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?
rereleasing movies
rereleasing movies esakal
Updated on

गेल्या काही महिन्यात काही जुने चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले. आज ३० ऑगस्ट रोजी 'तुंबाड', 'रहना है तेरे दिल मे' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर सप्टेंबर महिन्यातही काही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातंय. मात्र हे चित्रपट आता का रिलीज केले जात आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे आहे? त्यामागे काही कारणं आहे.

प्रेक्षकवर्ग

थिएटरमध्ये तेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत जे कल्ट चित्रपट म्हणून ओळखले जात आहेत. ज्या चित्रपटांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे. हे चित्रपट जुने असल्याने जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांना ते पाहण्याची संधी मिळाली नाही. किंवा तेव्हा या चित्रपटांचं म्हणावं तसं प्रमोशन केलं गेलं नाही. त्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. 'तुंबाड' हा चित्रपट भयपटांमध्ये टॉप ३ मध्ये गणला जातो. त्याची कथा, दिग्दर्शन, अभिनय सगळंच जबरदस्त आहे. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे तेव्हा या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही. तर ''रहना है तेरे दिल मे' या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेमात पाडलंय. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की गर्दी करणार असा विश्वास सिनेमागृह चालकांना आहे.

tumbad
tumbadesakal

सिनेमागृहात पाहण्याचा अनुभव

असं नाहीये की आता प्रदर्शित होणारे चित्रपट प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिले नाहीयेत. त्यांनी हे चित्रपट घरी पाहिले आहेत. मात्र हे चित्रपट सिनेमागृहात पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असणार आहे. सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक हे थिएटरमध्ये जास्त प्रभावशाली ठरतं. सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव हे प्रेक्षकांच्या चित्रपटगृहात गर्दी करण्याचं मोठं कारण ठरतंय.

rerelease in theatre
rerelease in theatreesakal

नव्या चित्रपटांची कमतरता

प्रत्येक शुक्रवारी थिएटरमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. ऑगस्ट महिन्यातही काही चित्रपट प्रदर्शित झाले मात्र सप्टेंबर महिन्यात फारसे मराठी किंवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. सणाचं वातावरण असल्याने बहुतांश निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. नव्या चित्रपटांची कमतरता असल्याने जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत.

rerelease in theatre
rerelease in theatreesakal

पैशांचं गणित

चित्रपटगृह रिकामं राहू नये. नवे चित्रपट नसले तरीही प्रेक्षक थिएटरपर्यंत यावेत, पैशाचा ओघ थांबू नये, थिएटर चालकाचं नुकसान होऊ नये या उद्देशानेदेखील हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत.

rereleasing movies
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचं 'गजानना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने सांगितलं कशी सुचली कल्पना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.