मेरे करण अर्जुन आएंगे नही, आगये! थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार शाहरुख सलमानचा 'करण-अर्जुन'; वाचा तारीख

Karan Arjun Rerelease In Theaters : लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट 'करण अर्जुन' पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
karan arjun rerelease
karan arjun rereleaseesakal
Updated on

बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट होऊ गेले ज्यांनी थिएटरमध्ये प्रदर्शित होताच इतिहास रचला. ब्लॉकबस्टर ठरले. या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजाच वेगळी आहेत. आजची तरुण पिढीही असे काही चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू इच्छिते. गेल्या तीन महिन्यात हिंदी सिनेसृष्टीत असा प्रयोगही करण्यात आला. ज्यात जुने चित्रपट नव्याने प्रदर्शित करण्यात आले. महत्वाचं म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या चित्रपटांच्या यादीत आणखी एक नाव घेतलं जाणार आहे. ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकगृहात रिलीज होणार आहे. राकेश रोशन यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केलीये. पुन्हा एकदा प्रेक्षकांना शाहरुख आणि सलमानची जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

तब्बल ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तेव्हाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान खानने एक ट्वीट करत याची घोषणा केली आहे. सलमानने एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'राखीजी खरं म्हणाल्या होत्या चित्रपटात की माझे करण अर्जुन येणार.' यानंतर त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. २२ नोव्हेंबरला जगभरातील थिएटर्समध्ये येतायत करण अर्जुन.

सलमानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये 'करण अर्जुन' चित्रपटाचे काही सीन दाखवण्यात आले आहेत. तर चाहते हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

karan arjun rerelease
'या' मालिकेने जिंकले सर्वाधिक पुरस्कार तर अक्षरा अधिपतीचा झाला हिरमोड, वाचा 'झी मराठी अवॉर्ड २०२४ 'च्या विजेत्यांची नावं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.