बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याने प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने प्रेमात पाडलं. त्याचे चित्रपट म्हणजे अर्धवट आणि पूर्ण अशा लव्हस्टोरीचा सागर असतो. त्याच्या चित्रपटातील लव्हस्टोरीसाठी तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. करणच्या चित्रपटांइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. त्याला दोन मुलं आहेत. तो सरोगसीद्वारे बाबा झाला आहे. त्याच्या या निर्णयाचं कायमच कौतुक होतं. मात्र आता त्याच्या पोस्टवर एका युझरने केलेली कमेंट पाहून करणने त्याला खडे बोल सुनावले आहेत. करणच्या उत्तरावर चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे.
करण जोहरने त्याची मुलगी रुही जोहरचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये ती तिचा फोन धरून सिरीला गाणे गाण्यास सांगत आहे. शनिवार, 24 ऑगस्ट रोजी पोस्ट केलेल्या या क्लिपचं सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी खूप कौतुक केलं. अली फजल, आयुष्मान खुराना, शिल्पा शेट्टी, मनीष मल्होत्रा, सबा पतौडी, डेलनाज इराणी आणि इतरांनी या पोस्टवर हसणारे आणि लाल हृदयाचे इमोजी पोस्ट केले. मात्र एका यूजरने यावर कमेंट करत विचारलं, 'रुहीची आई कोण आहे? कोणी सांगेल का? मी गोंधळलो आहे.
यावर करणने उत्तर लिहिलं, 'हो ना, मी पण तुमच्या गोंधळलेल्या परिस्थितीमुळे अस्वस्थ आहे. म्हणूनच मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल. रुहीची आई मीच आहे.' असं लिहीत त्याने सगळ्यांची बोलती बंद केली. त्याच्या या उत्तराचं कौतुक होत आहे. करण जोहरने 7 फेब्रुवारी 2017 रोजी यश आणि रुही जोहर या जुळ्या मुलांचे सरोगसीद्वारे स्वागत केलं. यश हे नाव करणचे दिवंगत वडील यश जोहर यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं. तर रुहीचे नाव तिची आई हिरू जोहर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. करण अनेकदा यश आणि रुहीचे क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.