प्रशस्त जागा, समोर समुद्र, कार्तिक आर्यन रेंटवर देतोय जुहूमधील घर; पण भाडं वाचून म्हणाल नको रे बाबा

Kartik Aaryan House On Rent: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने त्याचं जुहू येथील घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.
kartik aaryan
kartik aaryan esakal
Updated on

Bollywood Actor Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने कोणत्याही पाठिंब्याशिवाय बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्याचे काही चित्रपट भलेही फ्लॉप ठरले असतील तरीही त्याच्या अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तो चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. आता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र त्याचं कारण वेगळंच आहे. कार्तिकने त्याचं मुंबईतील घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. १८ कोटी किंमत असलेल्या या घराचं भाडंही तितकंच मोठं आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपली घरं भाड्याने दिली आहेत. ज्यातून ते लाखोंची कमाई करतात. आता त्यांच्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन याचाही समावेश झाला आहे. कार्तिकने ३० जून २०२४ मध्ये जुहू येथील सिद्धिविनायक प्रेसीडेंसी को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीमध्ये घर घेतलं होतं. या घराचा एरिया १९१२ स्क्वेअर फूट आहे. हे घर त्याने १७. ८ कोटींना घेतलं होतं आणि वरून १ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी दिले होते. हे अपार्टमेंट त्याने त्याची आई माला तिवारी यांच्यासोबत मिळून घेतलं होतं.

किती आहे घराचं भाडं?

हे घर समुद्र किनाऱ्यालगत असून घरातून समुद्राचा सुंदर व्हीव्यू दिसतो. कार्तिक या घरासाठी ४ लाख ५० हजार इतकं भाडं घेणार आहे. ही किंमत त्यामानाने ठीक असल्याचं सांगण्यात येतंय. याच बिल्डिंगमध्ये अनेक इतर कलाकारांची देखील घरं आहेत. तर याच बिल्डिंगमधील ८व्या माळ्यावर आणखी एक अपार्टमेंट अभिनेत्याच्या आई- वडिलांनी खरेदी केलं आहे. कार्तिकच्या कामाविषयी सांगायचं तर तो शेवटचा 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट फारशी चांगली कमाई करू शकला नव्हता. लवकरच तो 'भूलभुलैया २' मध्ये दिसणार आहे.

kartik aaryan
Marathi Serial TRP: शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'ची कमाल; कला, मुक्ताला टाकलं मागे; 'बिग बॉस मराठी५' कितव्या स्थानावर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.