Bhool Bhulaiyaa 3 Trailer: वादळ आलं अजून प्रलय बाकी आहे! कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलैया ३' चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित

Bhool Bhulaiyaa 3 Trailer Release: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या 'भूलभुलैया ३' ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जो पाहून नेटकरी स्तंभित झाले आहेत.
bhulbhulaiya
bhulbhulaiya esakal
Updated on

गेले कित्येक महिने प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर आज 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत लोकांची मनं जिंकताना दिसत आहे. कार्तिक आर्यननेही रुह बाबाच्या भूमिकेत आपलं सर्वस्व दिले आहे आणि तो पहिल्यांदाच खऱ्या मंजुलिकाला भेटला आहे. या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षितने आपली कमाल दाखवली आहे. कमाल कॉमेडी आणि तितकाच हॉरर असं योग्य मिश्रण असलेला 'भूलभुलैया ३' ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

सुमारे 3 मिनिटे 50 सेकंदांचा हा ट्रेलर 'सिंहासनाच्या लोभाने शतके घालवलेल्या रक्त घाटाच्या इतिहासाचं ते काळं सत्य म्हणजे मंजुलिका' या संवादाने सुरू होतो. यासोबत विद्या बालनची एंट्री होते आणि ती म्हणते आमी मंजुलिका. दुसरीकडे, कार्तिक आर्यन त्याच्या मस्त अंदाजात दिसत आहे. तो म्हणतोय की भुतांना घाबरणारं जग मूर्ख आहे. या भुतांचा फायदा आपण घेतला पाहिजे. यामुळे कार्तिक आर्यन भूतांच्या नावाने जगाला मूर्ख बनवू लागतो. त्याला अजून माहीत नाही की त्याच्यापुढे काय संकट उभे आहे. आणि मग सुरू होते ती कथा इतिहासाच्या पानांवरून ज्याचा कुठेही उल्लेख नाही. जर हे वादळ असेल तर प्रलय अजून यायचा आहे.एकीकडे माधुरी दीक्षित मंजुलिकाचं रूप घेऊन रूह बाबाला घाबरवते. तर दुसरीकडे विद्या बालन, माधुरी आणि तब्बू त्यांच्या भितीदायक अवतारात दिसत असून रूह बाबा त्यांचा सामना करताना दिसतो.

'भूल भुलैया 3' दिवाळीच्या मुहूर्तावर

'भूल भुलैया 3' पुढील महिन्यात 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'शी टक्कर देत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक टॉप स्टार्सचा भरणा आहे. 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच ८ ऑक्टोबरला रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

bhulbhulaiya
म्हणून अशोक सराफ यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांना आवाज दिला नाही, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.