2023 मध्ये आलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा केदार शिंदेंच्या चित्रपट सादरीकरणाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीचं चित्र पुन्हा एकदा पालटताना दिसलं आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफिस यशही मिळालं. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं यश आणि कलर्स मराठी वाहिनीची नवी जबाबदारी याविषयी केदार शिंदे यांनी नुकतच भावना व्यक्त केल्या आहेत. सकाळ माध्यमाला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीत ते बोलत होते. दिवाळी पाडवा निमित्ता लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे आणि पत्नी निर्मात्या बेला शिंदे यांनी यावेळी सकाळ प्रीमियरशी संवाद साधला होता.