सूरजला सिनेमात घेतलं म्हणून ट्रोल करणाऱ्या कलाकारांना केदार शिंदेंनी सुनावलं, म्हणाले- तुम्ही कधीही...

Kedar Shinde Slams Suraj Chavan Trollers: लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाणला ट्रोल करणाऱ्या कलाकारांना सुनावलं आहे.
kedar shinde
kedar shinde esakal
Updated on

नुकताच 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रॅड फिनाले पार पडला. यात झापून झुपक रीलस्टार सुरज चव्हाण महाविजेता ठरला. त्यानंतर लोकप्रिय दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी त्याला 'झापूक झुपक' या सिनेमाची ऑफर दिली. त्यानंतर काही कलाकारांनी त्याला थेट सिनेमाची ऑफर मिळाली म्हणून नाराजी व्यक्त केली होती. आम्ही १०- १० वर्ष थिएटर करूनही आम्हाला सिनेमा मिळत नाही पण याला छपरीपणा करून चित्रपट मिळाला असं म्हणत त्यांनी सुरजला ट्रोल केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी या कलाकारांच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे.

अशी कशी संधी मिळू शकते

केदार शिंदे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात बोलताना ते म्हणाले, 'एक व्यक्ती फक्त तीन महिन्याचा राहू नये. जर त्याच्यात टॅलेंट आहे वेगळं काहीतरी आह तर मी ती रिस्क घ्यायला तयार आहे. मलाही कुणीतरी कधीतरी संधी दिली होती. असं अचानक कुणी नाटक सिनेमा दिलेलं नव्हतं. त्याच्या लेखी त्याने खूप धडपड केली असेल. जेव्हा सिनेमा येईल. तेव्हा त्या लोकांना जाणवेल की हा रोल फक्त सुरजचं करू शकतो. आता राहिला प्रश्न अशी कशी संधी मिळू शकते. तर त्या त्या लोकांनी विचार करायला पाहिजे की आजपर्यंत मला नवीन लोकांसोबत काम करायला कधीच कुठलीच भीती वाटली नाही. प्रियांका यादव, क्रांती रेडकर, स्मिता शेवाळे,, भरत जाधव, अंकुश चौधरी यांनी पहिल्यांदा माझ्यासोबत काम केलं आणि त्यांच्यासोबत काम केलं.'

मी हाच विचार करत बसलो असतो तर...

ते पुढे म्हणाले, 'मला असं वाटतं की त्या लोकांनी असा विचार करू नये. ते जे कलाकार असतील त्यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवावा. त्याचा विचार जास्त करावा. जेणेकरून याला किती मिळतंय आणि त्याला किती मिळतंय हे विचार नाही येणार. मग असं बघायचं तर 'बाईपण भारी देवा' च्या अगोदर जेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकांचे सिनेमे चालत होते तेव्हा मी जवळपास ७ वर्ष इंडस्ट्रीतून बाहेर फेकला गेलो होतो. तेव्हा मी हाच विचार करत बसलो असतो तर महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण आला नसता. मी माझ्या कामाकडे फक्त लक्ष दिलं. तर त्या त्या लोकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावं. १०० टक्के त्यांना यापेक्षाही जास्त यश मिळेल. आता ते असं म्हणतात म्हणून त्यांना केदार शिंदे काम देणार नाहीत असं नाही. त्यांनी कधीही यावं. दरवाजे उघडे आहेत.'

kedar shinde
या वयात का लग्न केलं विचारणाऱ्यांना सिद्धार्थ चांदेकरच्या आईनेच दिलं उत्तर; म्हणाल्या- तीन वर्षांपूर्वी माझा अपघात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.