kedar shinde
kedar shinde esakal

Kedar Shinde On BB Marathi 5: म्हणून 'बिग बॉस मराठी 5' 70 दिवसात संपलं; केदार शिंदेनी सांगितलं खरं कारण

Kedar Shinde On Bigg Boss Marathi 5 End In 70 days : लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'बिग बॉस मराठी ५' लवकर का बंद झालं याबद्दल भाष्य केलं आहे.
Published on

'बिग बॉस मराठी ५' ने कलर्स मराठीला प्रचंड टीआरपी मिळाला. या कार्यक्रमाची गावागावात चर्चा रंगली. या सीझनचे अतरंगी स्पर्धक पाहून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. या कार्यक्रमाला कथाबाह्य कार्यक्रमातील सगळ्यात जास्त टीआरपी मिळाला. मात्र इतका गाजत असताना हा सीझन १०० ऐवजी ७० दिवसात संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे अनेक अंदाज लावण्यात आले. हा सीझन नेमका का बंद होतोय हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक होते. आता चॅनेलचे क्रिएटिव्ह हेड केदार शिंदे यांनी हा सीझन लवकर बंद करण्याचं कारण सांगितलं आहे.

निर्णयांचं पालन करणं हे आमचं काम

केदार शिंदे यांनी नुकतीच मुंबई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना केदार शिंदे म्हणाले, 'व्यवस्थापकीय पातळीवर काही निर्णय घेतले जातात. त्या निर्णयांचं पालन करणं हे आमचं काम असतं. त्यामुळे ‘कधी बंद करताय’ यापेक्षा ‘का बंद करताय’ हे विचारलं तर त्यात त्या कार्यक्रमाचं यश आहे.'

कार्यक्रम आमच्या म्हणण्यांनुसारही चालत नाही

रितेशच्या ट्रोलिंगबद्दल बोलताना ते म्हणाले, 'ट्रोलर्सना चेहरा नसतो. काही लोकांना ते आवडतं तर काही लोकांना ते आवडत नाही. पण ट्रोल करणाऱ्यांना कळायला हवं की, तुम्हाला वाटतं त्याप्रकारे कार्यक्रम चालू शकत नाही. त्याचप्रमाणे तो आमच्या म्हणण्यांनुसारही चालत नाही. घरात जे स्पर्धक असतात, त्यांच्यानुसार तो कार्यक्रम चालतो. तो त्यांचा गेम असतो, आमचा नाही. त्यामुळे शांत राहून या सगळ्यावर प्रतिक्रिया न देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. रितेशवर झालेलं ट्रोलिंग त्यानं ज्याप्रकारे हाताळलं ते कौतुकास्पद आहे. प्रत्येकाची स्टाइल वेगळी असते. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर एखादा सामना चांगला खेळले नाहीत; तेव्हा तेही ट्रोल झालेच होते. पण ते उत्तमच खेळाडू होते. ट्रोलर्सचं किती ऐकायचं आणि मनाला लावून घ्यायचं याला मर्यादा असतात.'

kedar shinde
Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.