...म्हणून केदार शिंदेंनी बदलला 'बिग बॉस मराठी ५'चा होस्ट; कोहली-रोहितचं उदाहरण देत म्हणाले- महेशदादाबद्दल

Kedar Shinde Talked On Changing Bigg Boss Marathi Host : 'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या होस्टवर काही प्रेक्षक नाराज आहेत तर काही खुश आहेत. आता केदार शिंदे यांनी होस्ट बदलण्याचं कारण सांगितलं आहे.
kedar shinde
kedar shinde esakal
Updated on

बिग बॉस मराठी ५' ची सोशल मीडियावर जोरदार हवा आहे. हा सिझनही जोरदार गाजतोय. या सीझनचं गाजण्याचं एक कारण म्हणजे बदललेला होस्टदेखील आहे. पहिले चार सीझन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केला होता. मात्र या वेळेस केदार शिंदे कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड बनले आणि त्यांनी बिग बॉसबद्दल मोठा निर्णय घेतला. रितेश देशमुख या कार्यक्रमाचा होस्ट बनला. पण अचानक बिग बॉस मराठीचा होस्ट का बदलला असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केदार शिंदे यांनी याचं उत्तर दिलं आहे.

केदार यांनी नुकतीच अतुल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना केदार म्हणाले, 'जुलैमध्ये बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाला. पण, संपूर्ण टीम फेब्रुवारीपासून काम करत होती. हा काळ खूपच आव्हानात्मक होता. कारण, याआधी झालेले बिग बॉस मराठीचे चार सीझन प्रेक्षकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते. टीआरपीमध्ये ते सगळे सीझन १.७-१.८ च्या अॅव्हरेजमध्ये होते. आज तोच अॅव्हरेज ३.५-३.७ पर्यंत आहे. भाऊचा धक्का तर ४.७ रेटिंगपर्यंत पोहोचला आहे. यासाठी तुम्हाला उत्तम कास्टिंग आणि रितेश देशमुखसारखा होस्ट मिळावा लागतो.'

येत पुढे म्हणाले, 'महेशदादांबद्दल मला अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा आहे. पण, यावर्षीचा बिग बॉस तरूण हवा होता. २०२४च्या दृष्टीने तो तरुण असायला हवा होता. त्यामुळे रितेश देशमुख यांच्याकडे आम्ही गेलो. आणि ते स्वत: देखील बिग बॉसचे फॅन असल्यामुळे ते उत्तम करत आहेत. पहिल्या दिवसापासून महेश दादा आणि रितेश देशमुख यांच्यामध्ये तुलना होणारच होती. पण, सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा आणि सचिन तेंडुलकरही वाईट खेळत नव्हता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सचिन चांगला खेळतो तर रोहित आणि विराट वाईट खेळत नाहीत. शेवटी प्रत्येकाची एक स्टाइल असते. आणि रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाइलने भाऊचा धक्का सादर करतात.'

kedar shinde
Phullwanti: प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' मध्ये दिसणार 'हे' कलाकार; समोर आली स्टार कास्ट, फोटो चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.