'वास्तव' हा चित्रपट कल्ट क्लासिकमध्ये गणला जातो. या चित्रपटाने प्रेक्षकांना आकार वेगळ्या जगाची ओळख करून दिली होती. एका वेगळ्या संजय दत्तची ओळख करून दिली होती. चित्रपटात मराठी कलाकारही होते. रीमा लागू, शिवाजी साटम यांच्यासोबत मराठमोळे संजय नार्वेकर देखील या चित्रपटात होते. त्यांची चित्रपटातील 'देड फुट्या'ची भूमिका चांगलीच गाजली. संजय दत्त आणि संजय नार्वेकर तेव्हा बॉक्स ऑफिसवर राज्य करत होते. प्रेक्षकांची या जोडगोळीला चांगलीच पसंती मिळाली. असं असलं तरी शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा संजय सेटवर गेले तेव्हा मात्र ते घाबरलेले होते. तेव्हा संजय दत्तने त्यांना धीर दिलेला. संजय दत्त असं काहीतरी बोलला ज्यामुळे नार्वेकर इतका उत्कृष्ट अभिनय करू शकले.
नुकतीच 'वास्तव' चित्रपटला २५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत नार्वेकर यांनी संजय दत्त पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत कसा वागला हे सांगितलं. नार्वेकर म्हणाले, 'मला आठवतं जेव्हा माझा पहिला दिवस होता तेव्हा मी खूप घाबरलेलो होतो. थोडा नर्व्हस होतो कारण समोर सुपरस्टार होता. जेव्हा माझा पहिला डायलॉग झाला तेव्हा शॉट सुरू होण्याच्या आधीच संजय बाबा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, हे बघ, तू पण संजय मी पण संजय, घाबरायचं नाही. जे होईल मिळून बघून घेऊ. टेन्शन नाही घ्यायचं. जेव्हा तो बोलत होता तेव्हा असं मुळीच वाटत नव्हतं की एक सुपरस्टार बोलतोय. असं वाटलं की एक जवळचा मित्र बोलतोय.'
संजय नार्वेकर पुढे म्हणाले, 'त्यानंतर मला तो एक आत्मविश्वास मिळाला. माझी भीती निघून गेली. ती गोष्ट मला आजही लक्षात आहे. मी ते कधीही विसरू शकत नाही. जर कुणी मला उलट बोललं असतं तर माझा आत्मविश्वास कमी झाला असता पण यासाठी संजय बाबाला १०० मार्क. दहीहंडीचा सीन शूट होत होता तेव्हा आमचे कोरिओग्राफर आम्हाला दाखवत होते की कसा डान्स करायचा आहे. तेव्हाच त्यांचा पाय सटकला आणि ते खाली पडले पण संजू बाबाने त्यांचा हात पकडला म्हणून ते वाचले. दुसरा कुणी असता तर त्याने माघार घेतली असती पण त्याने तसं केलं नाही. मला बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. तेव्हा संजू बाबाने मला मदत केली.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.