हे लोक शाळेत काय शिकतात? दक्षिणेकडील राज्यांची नावंही नाही सांगू शकली कियारा अडवाणी, नेटकरी म्हणाले-

Kiara Advani Troll Viral Video: लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तिला दक्षिणेकडील राज्यांची नावंही सांगता येत नाहीयेत.
kiara advani
kiara advani esakal
Updated on

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कियारा अडवाणी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. तिला 'कबीर सिंग' या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. सध्या कियारा सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे तिचा एक व्हिडीओ. दक्षिणात्त्य अभिनेता राणा दग्गुबाती याच्या 'नंबर १ यारी' या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमधली एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कियाराला दक्षिणेकडील राज्यांची नावं विचारण्यात आली आहेत मात्र ती न सांगू शकल्याने ती ट्रोल झालीये.

कियारा हिने दाक्षिणात्य अभिनेता रामचरण याच्यासोबत एका चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा राणा तिला दक्षिणेकडील राज्यांची नावं विचारली. त्यावर कियाराच्या तोंडावरून स्पष्ट दिसतंय की राज्यांची नावं आठवत नाहीयेत. कियाराने तेलंगणापासून सुरुवात केली. त्यानंतर तिने आंध्र प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटकचं नाव घेतलं. राणाला तिला तमिळनाडूची आठवण करुन देण्यासाठी मदत केली. राणाने तमिळ भाषा कुठून आली हे विचारलं. त्यानंतर ती केरळचा उल्लेख करायला विसरली. राणानं पुन्हा तिला मदत करण्यासाठी म्हटलं की मल्याळम ही भाषा कुठून आली? कियाराला या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. रामनं सगळ्यात शेवटी उत्तर दिलं केरळ. कियारा यावर म्हणाली, हो, मी हेच उत्तर देणार होते.

या क्लिपवरून ती प्रचंड ट्रोल होतेय. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'देवा, सोबोची ही मुलं अशा प्रकारे त्याच्या पॉश शाळेत जास्त फी देत परतफेड करतात. भारतातल्या कोणत्याही टियर 2 शहरातील सीबीएसई शाळेतील कोणताही मुलगा किंवा मुलगी सगळ्या राज्यांची नावं आणि त्यांच्या राजधानींची नावं सांगू शकतात.' आणखी एकाने लिहिलं, 'मला खरंच माहित नाही की हे मुलं भारतातील मोठ्या आणि महागड्या शाळांमध्ये नेमकं काय शिकतात. म्हणजे सरकारी शाळेतील बॅकबेंचर देखील हे सगळं सांगू शकतात.' तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

kiara advani
तारीख ठरली! आई- बाबा 'या' दिवशी येणार भेटीला; तर स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.