Badlapur Case: दोन महिन्यात... बदलापूर प्रकरणानंतर भर सभेत खोटं बोलले मुख्यमंत्री; किरण मानेंनी थेटच विचारलं, म्हणाले-

Kiran Mane On Eknath Shinde: बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
kiran mane
kiran mane esakal
Updated on

बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार घटनेचा संपूर्ण राज्यभरातून निषेध केला जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. आरोपीला अटक करण्यास उशीर करणाऱ्या पोलीस प्रशासनावर नागरिकांनी रोष व्यक्त केला.

मोठं आंदोलन करत अखेर प्रशासनाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. मात्र एकीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात मुख्यमंत्र्यांनी अशाच एका आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता अभिनेते किरण माने यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

रत्नागिरीत एका एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले, 'बदलापूरमध्ये घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल. त्याचबरोबर संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशाच चार महिन्यांपूर्वी आपल्या एका भगिनीवर बलात्कार झाला होता. आम्ही तो खटला फास्ट ट्रॅकवर चालवला आणि २ महिन्यात त्याला फाशीची शिक्षा झाली.'

आता मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर किरण माने यांनी थेट प्रश्न विचारला आहे. असं कधी घडलं होतं कुणी सांगू शकेल का असं ते म्हणाले आहेत. त्यांनी पोस्ट करत लिहिलं, 'मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, "चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली." इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस' म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही!'

त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांनी खरंच थाप मारली आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडे पुराव्याची मागणी केली आहे. अशी कोणतीही केस घडली नाही, कुणालाही इतक्या लवकर फाशी देण्यात आली नाही असं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.

kiran mane
Bigg Boss Marathi 5: तो बाबाचा स्वभाव नाही म्हणून... वडिलांचा अपमान करणाऱ्या जान्हवीवर संतापली पंढरीनाथ कांबळेची लेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.