सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकास ओरिजिनलची पहिली सीरिज ‘IPC’; 'या दिवशी होणार प्रदर्शित

Ultra Zakkas New Series IPC Release Date: महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या अनेक सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकासची पहिली ओरिजिनल सीरिज 'IPC' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
ipc
ipc esakal
Updated on

मुंबई 22 October 2024 : अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ ही वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राइम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवीकोरी वेबसीरिज देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या वेब सिरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर,सुरेश विश्वकर्मा व अभिनय सावंत ह्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. कोकणातील छोट्या गावात शिमगोत्सवाच्या दिवशी एका २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होतो आणि सुरु होते एक रहस्यमय थरारक घटनांची शृंखला जी वास्तवात घेऊन येते कल्पनेच्या पलीकडले सत्य, जे उलगडणार २५ ऑक्टोबरला.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राजेश चव्हाण या सिरीजचे दिग्दर्शक आहेत,आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर 'IPC' हि पहिली वेब सिरीज प्रदर्शित होणार असून हि तुम्हाला जगभरात कुठेही पाहता येईल.या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एक नवी मराठी वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारच्या कथा अनुभवायला मिळतील.”

'IPC' मराठी या वेब सिरीजचे दिग्दर्शक राजेश चव्हाण म्हणाले, “मी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे आभार मानतो की त्यांनी त्यांची महत्त्वाची अशी पहिली वेब सिरीज दिग्दर्शन करण्याची संधी मला दिली. हि वेब सिरीज दिग्दर्शित करण्यामागचा अनुभव फारच वेगळा आणि एक जवाबदारीपूर्ण होता. 'IPC' या गंभीर विषयावर वेब सिरीज तयार करण्यामागे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड कंपनीचा खूप मोठा पाठींबा आणि विश्वास होता.”

ipc
Bigg Boss Marathi Season 5 मध्ये सुरज चव्हाणला का घेतलं? केदार शिंदे म्हणाले- त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.