भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या घटस्फोटाचा मुद्दा सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजतोय. या जोडीने ३१ मे २०२० साली लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार पाच महिन्यांपासून त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. त्यातच हार्दिकची आयपीएलमधील खराब कामगिरी लपवण्यासाठी हे सगळं पसरवलं गेलं असल्याचंही बोललं गेलं. मात्र त्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या. त्या दोघांनी घटस्फोट घेतला आणि नताशा पुन्हा मायदेशी परतली. आता त्यांचा घटस्फोट का झाला याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाचं कारण जाणून न घेता बहुतांश नेटकऱ्यांनी नताशाला वाईट बोलत तिला दोष द्यायला सुरुवात केली. तिला गोल्ड डिगर म्हणत तिने पैशांसाठी हे सगळं केलं असल्याचं सांगत तिला बोल लावले गेले. तर नताशा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसल्याने तेच त्यांच्या घटस्फोटाचं कारण आहे असं सांगितलं गेलं. मात्र आता रेडिटवरील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय ज्यात त्यांच्या घटस्फोटाच्या कारणाबद्दल लिहिलं आहे.
या पोस्टनुसार, हार्दिकचे विवाहबाह्य संबंध होते आणि हेच त्यांच्या घटस्फोटाचं मुख्य कारण ठरलंय. ही पोस्ट करणाऱ्याने लिहिलं, 'हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करत होते मात्र त्यांच्यातील परिस्थिती तेव्हा बिघडली जेव्हा नताशा गरोदर राहिली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. थोड्या काळासाठी ते दोघे प्रेमात होते आणि हार्दिकने त्याच्या सगळ्या जुन्या सवयी सोडल्या होत्या. पण २०२३ पासून हार्दिकने इतर मुलींसाठी नताशाची फसवणूक सुरू केली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नताशाने त्याला रंगेहाथ पकडलं आणि तिथून खऱ्या अडचणी सुरू झाल्या.'
त्यांनी पुढे लिहिलं, 'त्यानंतर नताशाने या लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकमेकांची बदनामी न करता शांततेने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर नताशालादेखील पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे. ही माहिती मला त्यांच्यासोबत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.' या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. असं काही घडलं की सगळ्यात आधी स्त्रियांनाच का दोष दिला जातो असा प्रश्न आता अनेकजण विचारत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.