mukkam post bombilvadi
mukkam post bombilvadiesakal

ठरलं! परेश मोकाशींच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटात 'हिटलर'च्या भूमिकेत झळकणार हा बडा अभिनेता; पोस्टर पाहिलंत?

Paresh Mokashi Reveals Hitler From Mukkam Post Bombilwadi : लोकप्रिय दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. यात हिटलर कोण साकारणार आहे हे आता समोर आलं आहे.
Published on

लोकप्रिय मराठी दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. हा चित्रपट पुढील वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत हे महिन्याभरापूर्वी समोर आलं होतं. मात्र यात मुख्य पात्र कोण साकारणार, हिटलर कोण असणार हे मात्र गुलदस्त्यात होतं. आता अखेर या गुपितावरून पडदा उठला आहे. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच चित्रपटातील हिटलरचा पोस्टर समोर आला आहे.

'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटाची स्टार कास्ट रिव्हिल करण्यात आली होती. आता या चित्रपटातील हिटलर समोर आला आहे. यात लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले हे हिटलरची भूमिका साकारणार आहेत. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित होतं. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले. या नाटकावर आधारित सिनेमा आता १ जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखन केलं आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक करणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती – लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु. पो. बोंबिलवाडी’ साठी प्रशांत दामले यांना हिटलर म्हणून निवडलं आहे.

नुकतंच अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते त्यांच्या भूमिकेचं पोस्टर अनावरण करण्यात आलं. या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मूळात मी कुठल्याच अँगलने हिटलर दिसत नाही हे मला मान्य आहे. म्हणूनच मला ‘हिटलर’ म्हणून घेतलं आहे. असा हिटलर तुम्ही इतिहासात बघितला नसेल. या सिनेमात पूर्ण मॅडनेस आहे. या मॅडनेसमध्ये हिटलर कसा बसेल? हा प्रश्न मला पडला होता. पण परेशने ते काम केलं आहे. असा तिरका चित्रपट मी आजवर पाहिलेला नाही. सिनेमा चित्रित करणंही अवघड होतं. शील आणि अश्लील यात एक पातळ सीमारेषा असते. त्या सीमारेषेवर उभं राहून परेशने काम केलं आहे. मी बे दुणे पाच हे नाटक केलं होतं त्यातही अशाच पद्धतीने विनोद निर्मिती केली गेली होती. तसाच हा चित्रपट आहे. हिटलर, चर्चिल असेच असणार आहेत. वेडेपटातून चित्रपट निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे.'

mukkam post bombilvadi
Radhika Apte: कुणीतरी येणार गं! राधिका आपटे होणार आई; बेबी बम्प फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज; चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...