Zee Marathi Channel shows menstruation In Lakhat Ek Aamcha Dada: झी मराठीवरील मालिका 'लाखात एक आमचा दादा' ने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडते आहे. तर मालिकेतील कलाकारही आपल्या भूमिका उत्कृष्टरित्या साकारताना दिसतायत. अशातच आता ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे मालिकेत दाखवण्यात आलेला मासिक पाळीचा विषय. आजही आपल्याकडे अनेक ठिकाणी मासिक पाळी म्हणजे वाईट गोष्ट मानली जाते. एका नव्या जीवाला जन्माला घालण्यासाठी सगळ्यात महत्वाची असलेली ही गोष्ट विटाळ म्हणून पाहिली जाते. मात्र ही गोष्ट मालिकेत अत्यंत सुंदर रित्या दाखवण्यात आली आहे. हा विषय दाखवल्याने नेटकरी वाहिनीचं कौतुक करत आहेत.
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत सूर्या दादाच्या सगळ्यात लहान बहिणीला पहिल्यांदा पाळी आलेली दाखवण्यात आली आहे. ही गोष्ट घरात कुणी नसताना होते आणि रक्त पाहून भागू घाबरते. हे सगळं काय आहे याबद्दल तिला काहीच कल्पना नसते. तेव्हा सूर्या दादा तिला आईच्या मायेने समजावतो. तू आता मुलीची स्त्री झालीयेस असं म्हणतो. तर मालिकेत तिच्या बाईपणाचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सूर्यादादा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरं करणार आहे. स्त्रियांच्या आयुष्यातील ही नाजूक, महत्वाची गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणावर थेट मालिकेत दाखवण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या मालिकेचं आणि वाहिनीचं प्रचंड कौतुक होतंय.
एका नेटकऱ्याने लिहिलं, 'अतिशय सुंदर संकल्पना, अशी संकल्पना मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आणणं ही एक चांगली गोष्ट असून ती आताची गरजही आहेच, पण एक भाऊ, तर एक "मुलगा" म्हणून मुलींची ही "नाजुक" अवस्था समजून घेताना बघुन धन्य वाटले.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'खूप छान आई शिवाय किती अवघड असते मुलींसाठी.' तिसऱ्या युझरने लिहिलं, 'असे विषय कुठल्या सिरीयलमध्ये दाखवले जात नाहीत. खूप सुंदर प्रयत्न आहे.' तर अनेक नेटकऱ्यांनी नितीशच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं आहे. नितीशने हा विषय आपल्या घरातल्या बहिणीचा असल्यासारखा मांडला. त्याला पाहून खूप अभिमान वाटला. त्याच्या सामंजस्याचं कौतुक वाटलं. दुसरा अभिनेता असता तर कदाचित या सीनला नकार दिला असता, असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.