Madhuri Dixit on Sridevi: बॉलिवूडची 'धक धक गर्ल' असणारी माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'भूल भुलैया ३' मुळे चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आजही अनेक दिलांची धडकन आहे.
माधुरीच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होते. मात्र माधुरीने तिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या करिअरला धक्का दिला होता. ८० च्या दशकात अनेक अभिनेत्रींना माधुरीने मागे काढलं होतं.
त्यातलीच एक टक्करची अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात कट्टर वैर होतं असं म्हटलं जायचं. त्यांनी एकाही चित्रपटात एकत्र अभिनय केला नाही. त्यांची कधीही मैत्री झाली नाही. यावर पहिल्यांदाच माधुरीने आपली बाजू मांडली आहे.