मुलाखतकार - मयुरी महेंद्र गावडे
वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता 'मूषक आख्यान' या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मध्यवर्ती भूमिकेची धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. 'मूषक आख्यान' चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातचीत....
- यामागचं मुख्य कारण म्हणजे सातत्य..आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं अहिजे..सतत काही ना काही वेगळ्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत आणि एक कलाकार म्हणून हे मी आतापर्यंत करत आलो. आतापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि त्या लोकांना आवडल्यामुळे माझ्या कामात ते एक सातत्य राहिले आहे. म्हणजे जशी माध्यमं बदलत गेली..आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले, वेब सिरीज आल्या..मग त्यामध्ये सुद्धा रानबाजार सारखी वेब सिरीज असेल किंवा मानवत मर्डर सारखी वेब सिरीज असेल..यामधील माझ्या भूमिकांना देखील लोकप्रियता मिळाली..आणि मूषक अख्यान हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मी नऊ मजेशीर भूमिका केल्या आहेत. हा प्रयोग मी पहिल्यांदाच करत आहे.. आणि म्हणूनच हा चित्रपट माझ्यासाठी विशेष आहे.
- कुठल्याही सिनेमासाठी कलावंतांनी मेहनत ही केलेलीच असते. मेहनतीशिवाय एखादा सिनेमा केला आहे अशी काही गोष्ट नसते.. प्रत्यक्ष आपल्याला तिथे हजरही राहावं लागतं आणि तेवढे कष्टही घ्यावे लागतात. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्या चांगल्या सिनेमांना दाद मिळाली नाही तर वाईट हे नक्कीच वाटतं. याचे उदाहरण द्यायचं झालं तर मी एकदा दोन चित्रपट एकत्र केले होते ते म्हणजे 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' आणि 'गोष्ट छोटी डोंगराएवढी'. गोष्ट छोटी डोंगराएवढी हा शेतकरी समस्येवरचा सिनेमा होता.. आता २००८ साली केलेले हे दोन्ही सिनेमे होते.. त्यामध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळाले. पण त्या तुलनेत गोष्ट छोटी डोंगराएवढी चित्रपटाला नाही मिळाले. पण गोष्ट छोटी डोंगराएवढी हा खूप जास्त हृदयस्पर्शी चित्रपट आहे. जो २००८ पासून २०२४ पर्यंत आजही तो शेतकरी समस्येवर तेवढेच प्रभावी भाष्य करतो.. सिनेमाचं देखील एक नशीब असतं... पण मला असं वाटतं की त्या सिनेमाच्या प्रकारानुसार त्याला प्रतिसाद मिळत जातो.
- काय होतं आपण एक हाती भूमिका जेव्हा करत जातो तेव्हा कुठेतरी आपल्याला देखील त्याचा कंटाळा येतो. मग आपण ब्रेक घेतो. पण ब्रेक घेणं म्हणजे थांबणं नव्हे... तर त्यावेळी नवीन काय करता येईल याचा विचार करून त्या प्रकारे स्वतःला तयार केले पाहिजे... आता मध्यंतरी मी नाम या सामाजिक चळवळीशी जोडलो गेल्याने माझा काही वेळ तिथे गेला...पण आता पुन्हा नव्याने मी एक कलावंत म्हणून सुरुवात केली आहे.
- मी या विषयी आता काहीही भाष्य नाही करणार.. पण हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा विनोदी सिनेमा आहे. आणि या चित्रपटात गौतमी पाटील हे एक आकर्षण असणार आहे. कारण बऱ्याच प्रेक्षकांना तिचे नृत्य भावते... पण या चित्रपटाची गोष्ट सांगितली तर त्यातील गंमत निघून जाईल. यामुळे मी कथेची काही वाच्यता नाही करणार. पण एवढं मात्र नक्की सांगेन की ही प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कथा आहे.
- या नऊही भूमिका विनोदी आहेत.. विनोदी सिनेमा हा प्रेक्षकांना नेहमीच हसवतो, रिझवतो.. त्यामुळे मला विनोदी सिनेमा करायला देखील आवडतात. त्यात सातत्याने वेगळे प्रयोग करत राहणे, ही आजची गरज असल्याने मी विनोदी भुमिकांसोबतच गंभीर भूमिका असतील. त्यामध्येही थोडासा वेगळेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. आता या चित्रपटात नऊ विनोदी भूमिका असल्या तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या आहेत. मला आशा आहे की त्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.
- मला असं वाटतं की दिग्दर्शक होणं ही काही माझी महत्वाकांक्षा नाही. पण मी गरजेपोटी झालेला दिग्दर्शक आहे.. बऱ्याचदा आपण आपल्याला दिग्दर्शित करताना काय वेगळं करू शकतो..हे शोधत असतो. तर या निमित्ताने मकरंद अनासपुरे या दिग्दर्शकाने मकरंद अनासपुरे या अभिनेत्याला नऊ वेगवेगळ्या भूमिका करायला लावल्या आणि मला वाटतं ही एक गम्मत आहे..बाकी दिग्दर्शनाविषयी सांगायचं झालं तर गरजेपुरती झालेला दिग्दर्शक आहे.. फक्त एवढेच की या दोन्ही भूमिकेत काम करताना खूप मेहनत घ्यावी लागते.. कष्ट खूप पडतात.. आणि सगळ्या गोष्टींचे भान ठेवावे लागते. हे एक चॅलेंज म्हणता येईल.. आणि अशी अनेक कामे एकत्र करत असताना शेवटी कुठेतरी आपल्याही शक्तीला मर्यादा असतात, पण आपल्याला प्रयत्न मात्र सोडायचे नसतात आणि मी तसाच प्रयत्न केला आहे या सिनेमात...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.