बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. अनिल अरोरा हे ६२ वर्षाचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरातून उडी मारत आत्महत्या केली. मात्र त्यांच्या अशा टोकाच्या वागण्याचं कारण समोर आलं नव्हतं. त्यांनी ७ व्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आणि मलायका आणि अमृता यांच्या आई जॉयस घरातच होत्या. त्यांनी बाल्कनीतून खाली वाकून पाहिलं तेव्हा वॉचमन ओरडत होता आणि अनिल हे खाली पडले होते. मात्र आता या प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे.
अनिल यांनी मृत्यूपूर्वी आपल्या दोन्ही मुलींना फोन केला असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अनिल यांनी हा निर्णय घेतला तेव्हा मलायका पुण्याला होती. आत्महत्या करण्यापूर्वी अनिल अरोरा यांनी आपल्या मलाइका अरोरा आणि अमृता अरोरा या दोन्ही मुलींना फोन केला होता. या फोनवर मी आजारी असून आता थकलो आहे असं बोलून आत्महत्या केली. मी आजारी आहे आणि आता मी थकलोय हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. ही माहिती सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरली आहे. मात्र त्यांच्या पत्नी जॉयस यांनी ते आजारी नव्हते असं म्हटलं होते.
अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिमेकडील आयेशा मनोर या इमारतीत अनेक वर्षापासून राहत आहेत. अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजतात चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सकाळपासूनच अरोरा कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ए डी आर दाखल करून पार्थिव शव विच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कुपर रुग्णालयात पाठविले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेहता कुटुंबीयातील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शी यांचे काम सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.