बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचं सप्टेंबर महिन्यात निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सुरुवातीला रिपोर्टमध्ये ही आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं. मात्र पोलीस अजूनही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र आता अभिनेत्रीची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात ती वडिलांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी याबद्दल व्यक्त झालीये. ती वेळ आपल्यासाठी खूप कठीण होती. पण त्या वेळेत तिच्यासोबत उभे राहिलेल्या व्यक्तींचे तिने आभार मानलेत. आणि आपण असं काहीतरी काम करत आहोत जे आपल्या वडिलांसाठी श्रद्धांजली ठरेल असं ती म्हणाली आहे.
मलायकाने तिचे सावत्र वडील अनिल मेहता यांच्या निधनाबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ती म्हणाली, 'आपल्या सगळ्यांना पुढे जायलाच हवं. हेच माझ्या वडिलांनाही वाटत होतं. त्यांची आमच्याकडून हीच अपेक्षा होती. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचं खूप नुकसान झालं. मला हे समजायला, पचायला वेळ गेला आणि मी त्या वेळेची आभारी आहे. हे सर्व सोपं नव्हतंच परंतु स्वत: ला वेळ देणं आवश्यक आहे. कामावर परत आल्याने मला स्वतःवर लक्ष केंद्रित करणं, माझे मानसिक आरोग्य संतुलित करणे आणि माझ्या आईची काळजी घेणं सोपं झालं. मी काही ब्रँड्ससोबत काम करत आहे. मी काही खास कामही करत आहे, जे माझ्या वडिलांना समर्पित असेल. त्यांनाही माझा अभिमान वाटेल.
मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी 11 सप्टेंबर रोजी सकाळी घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मलायका आणि अमृता अरोरा 10 सप्टेंबरच्या रात्री आई आणि वडिलांना भेटण्यासाठी घरी आल्या होत्या. आणि दुस-याच दिवशी हा अपघात झाला त्यामुळे सगळेच चकीत झालेले. या दु:खाच्या वेळी संपूर्ण खान कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.