मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी वांद्रे येथील आयशा मनोर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस तपास करत असून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी मलायकाच्या वडिलांनी उडी मारल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी मलायकाची आई जॉयस पॉलीकॉर्प यांचा जबाब नोंदवला आहे. बुधवारी सकाळी नेमकं काय काय घडलं हे जॉयस यांनी सांगितलं आहे. मलायकाच्या वडिलांनी सकाळी ९ वाजता सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती आहे.
'न्यूज18'च्या रिपोर्टनुसार, मलायका अरोराच्या आईने पोलिसांना सांगितलं की, अनिल रोज बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत असत. त्यांचा आणि अनिल अरोरा यांचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकत्र राहू लागले होते. ते आयशा मनोरच्या सातव्या मजल्यावर राहत होते. मलायकाच्या आई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हणाल्या की, बुधवारी सकाळी जेव्हा त्या दिवाणखान्यात गेल्या तेव्हा त्यांनी पूर्वाश्रमीचे पती अनिल अरोरा यांची चप्पल पाहिली. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी बाल्कनीत गेल्या. बाल्कनीतही ते दिसले नाहीत तेव्हा त्यांनी खाली डोकावून पाहिलं.'
खाली वॉचमन मदतीसाठी ओरडत होता आणि अनिल अरोरा खाली पडले होते. अनिल अरोरा बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचं बोललं जात आहे, मात्र मलायकाच्या आईने या गोष्टीला साफ नकार दिला आणि त्यांना कोणताही आजार नसल्याचं सांगितलं. त्यांचे फक्त गुडघे दुखत होते. जॉयसच्या म्हणण्यानुसार, अनिल अरोरा यांनी मर्चंट नेव्हीकडून व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) घेतली होती. ते आरामात आयुष्य जगत होते. ते स्वतःहून उडी मारण्याची कोणतीच शक्यता नाही. हा निव्वळ एक अपघात असू शकतो.
'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून परिसराची मार्किंग करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्रत्येक दृष्टीने तपास केला जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे. वांद्रे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.