यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात बालदिनाच्या निमित्ताने अल्ट्रा झकास (मराठी ओटीटी) आणि अल्ट्रा प्ले (हिंदी ओटीटी) या दोन लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात चिमुकल्यांसाठी गाजेलेली मालिका आणि चित्रपट उपलब्ध असतील. हा महोत्सव महिनाभर सुरू राहणार असून ५० क्लासिक बालचित्रपट यामध्ये दाखविण्यात येणार आहेत. आर. के. नारायण यांनी ग्रामीण भारतीय जीवनाचे दर्शन घडविलेल्या व लहान मुलांच्या साहसी भावविश्वावर आधारित कथांचा समावेश असलेल्या 'मालगुडी डेज' चाही यात समावेश आहे. या प्लॅटफॉर्म्सवर 'मालगुडी डेज' हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
'मालगुडी डेज' ही मालिका या बालचित्रपट महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. 'मालगुडी डेज' ही मालिका म्हणजे भारतातले बालपण आणि छोट्या शहरांच्या मोहकतेचं सार सुंदरपणे मांडणारे अजरामर रत्न आहे. 'मालगुडी डेज' ही मालिका विशेषतः 'जेन झी' पिढीला एक वेगळा आनंद देईल. यासोबतच 'बाल गणेश', 'पवनपुत्र हनुमान', 'बाल हनुमान', 'जलपरी - द डेझर्ट मर्मेड', 'सुपरहिरो बेबी पांडा', 'बूनी बियर्स सीरिज', 'स्नोक्वीन ३ - फायर अँड आइस', 'द मॅजिक ब्रश' यांसारख्या चित्रपटांचा देखील आनंद प्रेक्षकांना घेता येईल.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपचे सी.ई.ओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “बालदिनानिमित्त आम्ही ही प्रसिद्ध मालिका अल्ट्रा प्ले आणि अल्ट्रा झकासवर उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे नव्या पिढीला 'मालगुडी डेज' चे जादुई विश्व अनुभवता येईल. आजच्या डिजिटल कंटेंटच्या युगात मुलांना वेगळी मजा आणि उत्कृष्ट कथाकथनाचा आनंद मिळावा, हा आमचा उद्देश आहे. शिवाय अल्ट्रा झकास आणि अल्ट्रा प्ले तुमच्यासाठी मनोरंजन, संस्कृती आणि कुटुंबाला एकत्र आणणारा खास कंटेंट आणण्यासाठी वचनबद्ध आहेत.”