Mallika Sherawat: माझं लक्ष वेधून घेण्यासाठी सेटवर भांडायचे अनिल कपूर अन् नाना पाटेकर; मल्लिका शेरावतचा दावा अन्...

Mallika Sherawat Talked On Anil Kapoor And Nana Patekar: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'वेलकम' चित्रपटाबद्दल एक गोष्ट सांगितली आहे
mallika sherawat
mallika sherawatesakal
Updated on

'मर्डर' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने या चित्रपटानिमित्त अनेक मुलाखती दिल्या. त्यातील एका मुलाखतीतमध्ये तिने आपल्या 'वेलकम' चित्रपटातील भूमिकेबद्दल आणि सहकलाकारांबद्दल भाष्य केलं आहे. 'वेलकम' मध्ये मल्लिकासोबत अक्षय कुमार, कतरिना कैफ, अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. आता मल्लिकाने या चित्रपटादरम्यानच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ज्यात तिने अनिल कपूर आणि नाना पाटेकर तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी भांडायचे असं म्हटलं आहे.

मल्लिकाने नुकतीच रणवीर इलाहाबादिया याला दिलेल्या मुलाखतीत तिला 'वेलकम' च्या सेटवरील काही फोटो दाखवले. त्याबद्दल बोलताना मल्लिका म्हणाली, 'हे माझे दोन प्रेमी, हा फोटो माझं आयुष्य दाखवतं. वेलकमच्या शूटिंगला मला खूप मजा आली. अनिल आणि नाना दोघेही माझ्यासाठी भांडायचे. ते माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचे. विचार करा की मला तेव्हा कसं वाटलं असेल किती महत्वाचं वाटलं असेल जेव्हा ते दोघे माझं लक्ष वेधून घेण्यासाठी भांडायचे. हे खूप छान होते. अभिनेते म्हणून त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे.'

यासोबतच तिने त्यांचा शूटिंगचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली, 'आम्ही जेव्हा दुबईला शूट करत होतो. तेव्हा तिथे एवढी गर्मी होती की आमचा मेकअपदेखील वितळून जायचा. त्यामुळे कुणालाच चित्रपटाच्या भविष्याबद्दल विचार करण्याचा वेळच नव्हता. कोणालाही चिंता वाटत नव्हती. आम्ही सगळे फक्त कधी पॅकअप होतंय आणि कधी आम्ही घरी जातोय हेच पाहत होतो.' सध्या मल्लिका तिच्या 'विक्कि विद्या का वो वाला व्हिडिओ साठी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

mallika sherawat
सलमान- शाहरुखचं भांडण मिटवणाऱ्या बाबा सिद्दीकींचं बॉलिवूडशी नेमकं कनेक्शन काय? सुनील दत्त ठरलेले कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.