Mamta Kulkarni: ड्रग्स केसमध्ये ममता कुलकर्णीला मोठा दिलासा; पुराव्यांअभावी न्यायालयाकडून क्लीनचिट, नवराच होता मास्टरमाइंड

Mamta Kulkarni Drug Case: लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यावर दाखल करण्यात आलेली ड्रग्स केस आता रद्द करण्यात आली आहे.
mamta kulkarni
mamta kulkarni sakal
Updated on

mamta kulkarni relive From Drug Case: एकेकाळी बॉलिवूडची हिट अभिनेत्री असणारी ममता कुलकर्णी हिच्यावर २०१६ साली ड्रग्स केस दाखल करण्यात आली होती. ड्रग्स तस्करी आरोपाखाली तिला अटकही करण्यात आली होती. आता त्या प्रकरणी न्यायालयाने अभिनेत्रीची निर्दोष सुटका केली आहे. याप्रकरणात ती गुन्हेगार ठरत नसल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. २०१६ साली पोलिसांनी काही व्यक्तींना ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून २००० कोटींचे इफेड्रिन जप्त करण्यात आले होते. त्यात ममतादेखील होती. मात्र आता या प्रकरणी अभिनेत्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तिला क्लीनचिट दिली आहे. नेमकं न्यायालयाने काय म्हंटलं वाचा.

मुंबई उच्च न्यायालयाने ममता कुलकर्णीची केस अखेर फेटाळून लावली आहे. पुराव्याअभावी ममता विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगत फौजदारी खटला फेटाळून लावला. या आदेशाबाबत न्यायालयाने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, हा खटला रद्द करण्याची ममता यांची याचिका स्वीकारली जाईल. ती आरोपीची पत्नी आहे म्हणून ती गुन्हेगार ठरत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.

'ड्रग्स घोटाळ्यात आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा दावा ममताने न्यायालयासमोर केला होता. 2018 मध्ये, ममता कुलकर्णीने तिच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ममताचा पती विकी गोस्वामी हा या रॅकेटचा मास्टरमाईंड मानला जातो, त्याने इफेड्रिन बनवलं होतं.

'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, ममताच्या याचिकेत म्हटले आहे की, 'फक्त याचिकाकर्त्याचे म्हणजेच ममताचे सहआरोपी विक्की गोस्वामीशी विशेष संबंध असल्याच्या आधारावर तिला आरोपी बनवता येणार नाही.' 12 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेल विभागाने दोन कार थांबवून 2-3 किलो इफेड्रिन जप्त केले होते. त्यांची किंमत सुमारे 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली होती. अभिनेत्रीसह इतर 7 जणांना वाँटेड घोषित करण्यात आले. केनियातील एका हॉटेलमध्ये ममता कुलकर्णीचा एक आरोपी, त्याचा सहकारी विकी गोस्वामी आणि इतर यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. 2017 मध्ये, गोस्वामी यांना यूएस ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीने (DEA) ताब्यात घेतले होते.

mamta kulkarni
अगं तू कशी, तो कसा, याच्याशी लग्न का केलंस? अरुण कदम यांच्या पत्नीला अनेकदा केलं गेलं ट्रोल, आता दिलं सणसणीत उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.