निक्की जे वागली ते सगळं माफ? आर्याला घराबाहेर केल्याने भडकला मराठी अभिनेता, पोस्ट करत मेकर्सना सुनावलं

Marathi Actor Angry On Bigg Boss Marathi 5: मराठी रॅपर आर्या जाधव या आठ्वड्यात घराबाहेर झाली पण त्यावर मराठी अभिनेत्याने देखील संताप व्यक्त केला आहे.
bigg boss marathi 5
bigg boss marathi 5esakal
Updated on

लोकप्रिय मराठी रॅपर आर्या जाधव हिच्या 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातून बाहेर जिन्यावरून वातावरण चांगलाच तापलं आहे. या आठवड्याच्या टास्कमध्ये आर्याने निक्कीला कानाखाली मारली. त्यानंतर निक्कीने आर्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने आर्याची चांगलीच शाळा घेतली. त्याबरोबर आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नेटकऱ्यांनी बिग बॉसमराठी खडे बोल सुनावले. आता मराठी अभिनेत्याने देखील आर्याची बाजू घेत 'बिग बॉस मराठी'ला सुनावलं आहे.

बिग बॉस मराठी १ मध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग याने आर्याच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. आर्याला घराबाहेर काढल्यानंतर पुष्करने एक पोस्ट केली आहे. त्याने पोस्ट करत निक्की आणि आर्या यांच्यातील भेदभावाबद्दल भाष्य केलं आहे. निक्की जे वागते त्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न त्याने विचारला आहे. त्याने पोस्ट करत लिहिलं, 'मी आर्याच्या बाजूने उभा आहे. मला आर्यासाठी खूप वाईट वाटतंय. मला माहितीये की ती चूक होती. ती जे वागली ते चूकच होतं. पण गेल्या सहा आठवड्यापासून निक्की जे वागतेय तिचं विषारी वागणं, माणुसकी सोडून वागणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे.'

aarya jadhav elimination
aarya jadhav eliminationesakal

त्याने पुढे लिहिलं, 'निक्कीची भाषा, तिचं दुसऱ्याला अपमानास्पद बोलणं, ती इतरांशी ज्या पद्धतीने वागते ते सगळं शिक्षेस पात्र आहे. तिच्यावर कारवाई का होत नाही?' त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. नेटकरी देखील त्याच्या या मताशी सहमत आहेत. आता बिग बॉस बघणं बंद असं म्हणत नेटकऱ्यांनीही कलर्स वाहिनीवर राग व्यक्त केला आहे.

bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi 5: हे महागात पडेल... कालच्या भाऊच्या धक्क्यावर भडकले प्रेक्षक; म्हणतात- रितेशसुद्धा निक्कीलाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.