छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात आवडीनं पाहिला जाणारा विषय. या मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनते. काही प्रेक्षक तर मालिकेतील कलाकारांना आपल्या घरातील सदस्य समजू लागतात. इतकंच नाही तर कलाकारांनाही मालिकेच्या नावाने ओळखलं जातं. मात्र जुन्या कलाकारांची एक्झिट आणि नव्या कलाकाराची एंट्री या गोष्टी मालिकेत घडत असतात. त्यामुळे एखाद्या भूमिकेत एका कलाकाराला स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कलाकाराला त्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना जड जातं. आता अशाच एका लोकप्रिय मालिकेचा अभिनेत्याने निरोप घेतला आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' मधून अभिनेत्याने एक्झिट घेतलीये.