राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या दुप्पट अनुदानाचं काय झालं? मुनगंटीवारांची घोषणा हवेतच विरली? कलाकारांचा सवाल

Subsidy For National Award Film: नुकत्याच पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
maharashtra state film awards
maharashtra state film awards esakal
Updated on

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. हा पुरस्कार सोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान दिले जाईल अशी घोषणा मागील वर्षी केली होती. त्या घोषणेचे आता काय झाले असा प्रश्न चित्रपटसृष्टीत उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांची ही घोषणा आता हवेतच विरणार का...असेही बोलले जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार नेहमीच मदत करीत असते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती व्हावी...मराठी चित्रपटसृष्टीला चालना मिळावी याकरिता शासन अनुदान देत असते. अ व ब दर्जाच्या मराठी चित्रपटांना चाळीस आणि तीस लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याकरिता शासनाची एक अनुदान समिती असते आणि ती समिती उत्तम तसेच दर्जेदार चित्रपटांची अनुदानासाठी निवड करते. परंतु मागील वर्षी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेचा मुद्दा आता राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने चर्चेला आला आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले चित्रपट तसेच महान व्यक्तींवरील चित्रपटांना सरकार दुप्पट अनुदान देईल अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य पसरलेले होते. निर्माते व दिग्दर्शक यांचा उत्साह वाढला होता. परंतु अद्यापही त्या घोषणेची अंमलबजावणी न झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नाराजी पसरलेली आहे. आता राज्य पुरस्कार सोहळ्या होईपर्यंत या घोषणेची अंमलबजावणी होईल अशी निर्माते व दिग्दर्शकांना आशा आहे.

निर्माते व लेखक रमेश दिघे यांच्या फनरल या चित्रपटाला सन २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ते म्हणाले, की आम्ही चित्रपट अनुदानासाठी केला नव्हता. आम्ही आमच्या आनंदासाठी केला होता. दिग्दर्शक विवेक दुबे आणि कलाकार आरोह वेलणकरसहित संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. आमच्या मेहनतीचे फळ म्हणून आमच्या चित्रपटाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यातच कोरोनाच्या महामारीमध्ये आमचे आर्थिक गणित बिघडलेले होते. त्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांना दुप्पट अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली. त्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी न झाल्याची खंत वाटत आहे.

गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले, की सांस्कृतिक मंत्र्यांनी घोषणा केली त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्यांच्या घोषणेमुळे आणखीन चांगले चित्रपट बनविण्याची जिद्द मनामध्ये निर्माण झाली. परंतु घोषणा होऊन एक वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती कधी होणार आहे याची वाट पाहात आहोत.

maharashtra state film awards
R R Patil: ज्या राज्याने तुला मोठं केलं त्याला... जेव्हा आर आर आबांनी अमिताभ बच्चन यांना झापलेलं; वाचा तो किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.