Actress Accident: ट्रॅफिक सिग्नल पाहून थांबली अन् मागून... लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात; CCTV फुटेज समोर

Marathi Actress Accident: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला आहे. त्याचा व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिला गंभीर दुखापत झाली आहे.
rupali kadam
rupali kadam esakal
Updated on

तुम्ही अनेकदा ट्रॅफिक सिग्नल न पाळल्यामुळे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. रॅश ड्रायव्हिंग करत इतरांच्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या व्यक्तींना पाहिलं असेल. नुकत्याच घडलेल्या पोर्शे आणि वरळी हिट अँड रन केसेसमूळे यावर किमान बोललं जातंय. मात्र ट्रॅफिक सिग्नल पाळल्याने एका व्यक्तीचा अपघात झाल्याचं कधी ऐकलं आहे का? अशी घटना एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडली आहे. ट्रॅफिक सिंगल पाळल्याने तिचा अपघात झाला आहे. यात तिचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. रुपाली कदम असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने तिच्या अपघाताचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रुपाली छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मध्ये दिसली होती. ती एक मॉडेलदेखील आहे. तिने तिच्या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की घडलेल्या प्रकारात तिची काहीही चूक नव्हती. रस्ता मोकळा असला तरी सिग्नल असल्याने रुपाली थांबली. मात्र तिच्या मागून येणाऱ्या भरधाव बसने तिला धडक दिली. मागून वेगाने येणाऱ्या बस चालकाला सिग्नलवर थांबायचं नव्हतंच शिवाय रुपालीही तिथे थांबणार नाही वाटल्याने त्याने बसचा वेग मुळीच कमी केला नाही. मात्र रुपाली थांबताच त्याने कशी बशी बस वळवली मात्र शेवटी रुपालीला बसची जोरदार धडक बसली.

रुपालीने काही फोटोही या व्हिडिओसोबत शेअर केले आहेत, ज्यात तिच्या डोळ्याला जबर मार लागलेला दिसतो आहे आणि चेहऱ्यावर सूजही दिसते आहे. या व्हिडिओवर तिने उपहात्मक पद्धतीने लिहिले की, 'भारतात रहदारीच्या नियमांचे पालन का करू नये याचे उदाहरण, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स.'

हा व्हिडिओ शेअर करत रुपालीने लिहिलं, 'होय माझ्या पाठिशी भगवान शंकराचा आशीर्वाद आहे, या नवीन जीवनासाठी मी कृतज्ञ आणि आभारी आहे. माझा अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सुरक्षितेला नेहमी प्राधान्य का दिले जावे. हेल्मेटमुळे डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी झाला. यामुळे चेहरा, खांदा आणि मानेला गंभीर दुखापत होण्याचा धोकाही कमी झाला. भारतात, सर्व बाइक आणि स्कूटर स्वारांसाठी हे अनिवार्य आहे. शिवाय माझ्या फिटनेस रूटीनमुळे मला असे वाटते की मला कोणतेही गंभीर शारीरिक नुकसान झाले नाही'. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे.

rupali kadam
सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला पाहिजे... शुभांगी गोखले यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- दारू पिऊन पत्ते खेळणं हे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()