आताच्या दिवाळीत जुनी मजा नाहीच... कुणाला गावी जायची घाई तर कुणाला फटाके उडवायची, कलाकारांनी सांगितल्या आठवणी

Marathi Celebrity Diwali: कलाकार यंदाच्या दिवाळीत काय काय करणार आहेत याबद्दल त्यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
marathi celebrity
marathi celebrity esakal
Updated on

चित्रपटसृष्टीतील कलावंत वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये, सिनेमा-मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असतात. अनेकांना दिवाळीसारख्या सणालाही त्यांच्या गावी जाता येत नाही; पण त्यांना आजही गावात साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी रुंजी घालतात. त्याच आठवणी सांगताहेत सेलिब्रिटी....

वाणी कपूर

माझ्यासाठी हे वर्ष खूपच व्यग्र आहे, मी माझ्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला इतक्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इंडस्ट्रीतील काही सर्वोत्तम निर्माते, दिग्दर्शक आणि सह-अभिनेत्यांसोबत काम करण्याचीही संधी मिळाली आहे. खरंतर दिवाळी मी माझ्या कुटुंबासोबत दिल्लीत साजरी करते. तिथे सगळीकडे दिवाळीचे वातावरण खूपच खास असते. आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीतील क्षण एकत्र घालवणे हाच खरा दिवाळीचा आनंद आहे. त्यातही घरचे गोड आणि चविष्ट पदार्थ मला प्रचंड आवडतात आणि यंदा, हे दिवाळीचे क्षण मी मिस करत आहे.

हेमल इंगळे

दिवाळीत कुटुंबासोबतचा वेळ, हेच खूप खास असतं. कधी एकदा गावी जाऊन आईच्या हातचा फराळ खाते, असं होतं. फराळात भाजणीची चकली, शंकरपाळ्या आणि पालकची शेव फार आवडते. आमच्या कोल्हापूरच्या शेवची चव दुसरीकडे कुठेच नाही, हे माझंच नाही तर सगळ्या कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे. लहानपणी दिवाळीत सकाळी लवकर उठायचं. उटणं लावून आई अभ्यंगस्नान घालायची; पण आता तसं होत नाही. आता जरा उशिरा उठलं तरी चालतं. त्यामुळे लहानपणी आपल्याला जी सवय होती, ती आता राहिलेली नाही. लहानपणी वृत्तपत्रात कुठला किल्ला सुंदर आहे ते बघायचं आणि तो किल्ला कुटुंबासोबत बघायला जाण्यात फार मज्जा यायची. आता असं असतं की शूटिंग संपून कधी घरी जाते असं होतं. मागच्या वर्षी मी शूटिंगमुळे पाडव्याला गावी गेलेले; या वर्षीदेखील मी शूट संपवून गावी जाणार आहे.

स्मिता शेवाळे

बाबा असतानाची दिवाळी खास असायची. कारण, काहीही झालं तरी ते दिवाळीसाठी खूप सुंदर असे ड्रेस घेऊन यायचे. त्या ड्रेससाठी मी वर्षभर वाट बघायची. लहानपणीची दिवाळी आई-बाबा जशी साजरी करायचे तशी होती, आताची दिवाळी मी माझ्या पद्धतीने साजरी करते. कारण, घरात फराळ बनवण्यापेक्षा बाहेरूनच मला फराळ जास्त येतो. मला असं वाटतं किल्ले बनवण्यापेक्षा ते बघायला जावेत. भाऊबीजेच्या दिवशी एखादा पदार्थ तयार करून सगळ्यांना खाऊ घालायला मला फार आवडतं.

कश्यप परुळेकर

मी मूळचा रत्नागिरीचा असलो तरी दिवाळी बहुदा पुण्यातच साजरी केली आहे. कोकणात कधी जाणंच झालं नाही. लहानपणीची दिवाळी फार गमती-जमतीची होती. आम्ही एकदा सगळे शेकोटी पेटवून बसलो होतो. एक लहान मुलगा आला आणि सुतळी बॉम्ब शेकोटीत टाकला. त्याला कल्पनाच नव्हती की, हा मोठ्याने फुटेल. तो जोरात फुटला. बरं झालं, कुणाला काही फार इजा झाली नाही. अजून एक आठवण म्हणजे आत्याच्या घरी असताना बाहेरून खिडकीतून रॉकेट डायरेक्ट घरात आलेलं. तेव्हाही कुणाला इजा झाली नव्हती. बालपणीच्या दिवाळीत फोन वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या आणि आता एका हातात अगरबत्ती आणि एका हातात फोन असतो. बालपणीची दिवाळी होती तशी आताच्या दिवाळीत मज्जा उरलेली नाही.

marathi celebrity
अमृता खानविलकरने खरेदी केलं नवं घर, २२ व्या मजल्यावरून दिसतंय सारं शहर; घराचं नाव वाचलंत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.