त्याच्या आसपास असणाऱ्यांनी ... मायकल जॅक्सनसोबत शेवटच्या दिवसात काय घडलेलं? बॉडीगार्डने सांगितलं सत्य

Micheal Jackson Death Reason: मायकल जॅक्सन हे संगीत जगतातील एक असं नाव जे आजही अनेकांच्या तोंडावर असतं. ज्याच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
micheal jackson
micheal jacksonesakal
Updated on

मायकल जॅक्सन हे नाव ठाऊक नाही असा व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारा मायकल कित्येकांचा लाडका होता. त्याने आपल्या आवाजाने चाहत्यांना भुरळ घातली होती. मायकलला १५० वर्ष जगायचं होतं. त्यासाठी त्याने डॉक्टरांची फौज ठेवली होती. ते रोज त्याच्या शरीराची तपासणी करत मात्र तरीही १५० वर्ष जगण्याची इच्छा असणारा मायकल अवघ्या ५० व्या वर्षी मरण पावला. असं का झालं हे तेव्हा कुणालाही कळलं नाही. आता त्याच्या बॉडीगार्डने त्याच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे त्याने सांगितलं आहे.

२५ जून २००९ रोजी मायकलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा आरोप हा त्याच्या डॉक्टरांवर टाकण्यात आला. आता मायकलचा बॉडीगार्ड बिल व्हिटफिल्ड याने त्याच्या मृत्युबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. बिलने नुकतीच द सनला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'मला वाटतं की कोणीतरी ही चूक केली आहे? तर हो, मी माझ्या परीने हे समजून घेण्याचा खुप प्रयत्न केला की हे सर्व जाणूनबुजून केलं गेलं होतं का? मायकल त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये खूप अशक्त झाले होते. दौरा सुरू होण्यापूर्वी खूप गोष्टी बदलल्या होत्या. त्यांच्या आयुष्यातील बाकीचे लोक आपापल्या कामात खूप व्यस्त होते. आणि त्यादरम्यान मायकलने गाण्याचा जास्त सरावही सुरू केला होता. मला वाटतं या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर खूप परिणाम होत होता'

तो पुढे म्हणाला, 'मला अनेकदा विचारलं जातं, त्यांच्या मृत्यूचे कारण काय आहे? आणि यावर मी लोकांना अनेकदा उत्तर दिलं आहे. लोकांना त्याच्या आजूबाजूला राहायचे होतं आणि त्यातील अनेकांना त्यांच्याकडून काहीतरी हवं होतं. त्याच्या संपत्तीवर अनेकांचा डोळा होता. त्याचा त्याच्यावर परिणाम होत होता. ते सतत त्याचा विचार करत असायचे. ते तणावाखाली होते आणि तणाव धोकादायक असतो.' या मुलाखतीत बिलने मायकलवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दलही सांगितलं आहे. ते तसे मुळीच नव्हते असं तो म्हणाला आहे.

micheal jackson
त्यांनी सगळ्यांना समोर उभं केलं... जेव्हा अभिजीतला बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलेलं; गायकाने सांगितली आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.