Bigg Boss Marathi 5 Latest Updates: सध्या छोट्या पडद्यावर 'बिग बॉस मराठी ५'ची प्रचंड चर्चा आहे. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम उत्तम कामगिरी करताना दिसतोय. घरात खेळले जाणारे निरनिराळे खेळ हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतारतायत. तर अपेक्षा नसलेले खेळाडू देखील उत्तम काम करतायत. आता प्रत्येक सदस्यांची लोकप्रियतादेखील वाढतेय. तर बिग बॉस मराठेच आधीच्या सीझनचे खेळाडूदेखील या सीझनच्या स्पर्धकांवर अनेकदा ताशेरे ओढताना दिसतात. आता 'बिग बॉस मराठी ३'ची स्पर्धक लोकप्रिय अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने अंकिता वालावलकर हिच्या खेळावर वाईट प्रतिक्रिया दिली आहे. मात्र तिच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी उलट तिचीच शाळा घेतली आहे.
परवाच्या भागात अंकिता वालावलकर ही सुरजला खेळाबद्दल सल्ला देताना दिसून आली. सूरजला अजूनही खेळ समजला नाहीये आणि तो कॅमेरावरही दिसत नाहीये. त्यामुळे अंकिता सूरजला काय करायचं आणि काय करायचं नाही हे सांगताना दिसली. यावर मीराने एक पोस्ट शेअर करत अंकिताच्या विरोधात पोस्ट केली आहे. अंकिता तिला वाट्टेल तशी खेळते आणि सूरजला सल्ले देते. सुरज तू तुला वाटेल तसं खेळ असं तिने लिहिलं. ही पोस्ट करत मीराने लिहिलं, 'हिला जसं खेळायचं तसं खेळते आणि दुसऱ्यांना अडवते. असा नको करू तसं नको खेळू. सुरज तू लढ बाप्पू.' तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मात्र उलट तिलाच सुनावलं आहे.
एका नेटकऱ्याने लिहिलं, 'तु कशी खेळली आहेस ते सगळ्यांनी बघितलं आहे म्हणून तर हाकलून दिलं तुला, बिग बॉसने शेवटपर्यंत आणलं तुला. आली मोठी अंकिताशी कम्पेअर करतीये.' आणखी एकाने लिहिलं, 'हिने हिचा सीझन कसा खेळलाय ते लोकांना माहीत आहे उगाच हिने ज्ञान पाजळू नये आणि कोण चांगलं कोण वाईट हे जाणण्यासाठी प्रेक्षक सुजाण आहेत.' आणखी एकाने लिहलं, 'ती सुरजला चांगल्या गोष्टीचं सांगत होती. ती काही चुकीचं बोलली नाही. त्याला खेळता येत नाही, गेम कळला नाही हे खरं आहे. तू तिच्याबद्दल बोलायची गरज नाही.' अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिचीच शाळा घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.