कलाकार नेहामीच सोशल मीडियावर हटके रील शेअर करत असतात. ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करून तो शूट करून चाहत्यांसोबत शेअर करता आणि चाहत्यांची वाहवा मिळवतात. मात्र तुम्ही कधी एखाद्या व्हायरल गाण्यावर जिम केलीये का? सध्या सोशल मीडियावर 'वाटण्याचा गोल दाणा' हे गाणं व्हायरल झालंय. अनेक नेटकरी आणि इन्फ्लुएन्सर्स यावर रील बनवताना दिसतात. पण या गाण्यावर आमिर खानच्या जावयाने चक्क कलाकारांकडून जिम करून घेतलीये. आमिर खानची मुलगी आयरा खान हीचा पती नुपूर शिखरे याने अभिनेत्री मिथिला पालकर आणि अभिनेता,इन्फ्लुएन्सर सारंग साठे यांच्यासोबत एक रील शेअर केली आहे. जी पाहून नेटकरीही पोट धरून हसतायत.
नुपूर हा सेलिब्रिटी जिम ट्रेनर आहे. त्याने अनेक बॉलिवूड कलाकारांना जिमची ट्रेनिंग दिली आहे. त्याने सारंग आणि मिथिला यांच्यासोबत एक धमाल रील शेअर केलीये जी पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करतायत. या व्हिडिओच्या सुरुवातीला नुपूर त्याच्या फोनमध्ये 'वाटण्याचा गोल दाणा' हे गाणं प्ले करतो. त्यानंतर मिथिला आणि सारंग दोघेही अंतर्नागी पोज देऊन डान्स आणि जिम दोन्ही करताना दिसतायत. या व्हिडिओवर त्यांनी लिहिलं, 'जेव्हा तुमच्या जिम इन्स्ट्रक्टरची प्लेलिस्ट तुमच्या एनर्जी सोबत मॅच होते.' त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून लाइक आणि कमेंट केल्या आहेत.
नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनीही त्यांच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष यांनीही यावर कमेंट केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने लिहिलं, 'प्रत्येकी दोन किलो फराळ तिघांनाही.' आणखी एकाने लिहिलं, 'पाय घसरून पडशील आणि बोंबलशील टणाटणा.' दुसऱ्याने लिहिलं, 'डॉल्बीवाल्या ' या गाण्याच्या पुढे आता हे गाणं वाजेल. 'त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.