सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना धमक्या आल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी याने दुबईमधून कोलकाता येथील भाजप नेते आणि अभिनेते मिथुन यांना धमकी दिल्याची माहिती आहे. जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना पश्चाताप करावा लागू शकतो असं म्हटलं आहे. त्याचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात तो मिथुन चक्रवर्तीना यांना धमकी देत आहे आणि माफी मागण्याचा सल्ला देतोय.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या महिन्यात उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका पक्षाच्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केलेलं. त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. ते म्हणाले होते, 'आज मी अभिनेता म्हणून नाही तर 60 च्या दशकातील मिथुन चक्रवर्ती म्हणून बोलत आहे. मी रक्ताचे राजकारण केले आहे, त्यामुळे राजकारणातील डावपेच माझ्यासाठी नवीन नाहीत. मला माहीत आहे की पुढे काय पाऊल उचलले जाईल. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सांगत आहे की, यासाठी जे काही आवश्यक असेल ते मी करेन. हिंदूंना कापल्यानंतर भागीरथीत बुडवू, असे येथील एका नेत्याने म्हटले होते. मला वाटले होते की मुख्यमंत्री काही बोलतील पण त्या काही बोलल्या नाही पण मी तुम्हाला याच भूमीत गाडून टाकेन असे म्हणत आहेत.'
मिथुन यांच्या याच व्हिडिओवरून भट्टी याने त्यांना १० ते १५ दिवसात माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यांनी त्यांचं मुस्लिम व्यक्तींना कापून त्याच्या जागी टाकून देऊन असं वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं आहे. 'तुम्ही आमचं मन दुखावलंय. तुमचे मुस्लिम फॅन्सदेखील आहेत. त्यांनीही तुम्हाला मान दिलाय. भलेही तुमचे चित्रपट फ्लॉप झालेत. तरीही आम्ही ते पाहायला गेलोय. तुमच्या वयाचा व्यक्ती काहीतरी बरळतोच पण त्यामुळे त्याला पुढे पश्चाताप करावा लागतो. मी व्हिडिओ बनवून कुणाला धमकी नाही देत पण हा कोणताही चित्रपट नाहीये. अशा लढाईचा विचार करू नका जी तुम्ही जिंकू शकत नाही.
भट्टी लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याचं सांगितलं जात आहे. तो पाकिस्तानी कुख्यात गुन्हेगार फारुख खोखरचा उजवा हात मानला जातो. ईदच्या मुहूर्तावर त्याने तुरुंगात असलेल्या बिष्णोईंना व्हिडिओ कॉल केला होता. सलमान आणि लॉरेन्स यांच्यात तडजोड करण्याचाही प्रयत्न केला होता, असा दावाही यात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.