'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने करिअरच्या ऐन टप्प्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असताना लग्न केलं. तिने तीन मालिका केल्या आणि त्या तिन्ही मालिका सुपरहिट ठरल्या. त्यानंतर तिने लग्न केलं आणि परदेशात स्थायिक झाली. आता अनेक वर्षांनी ती भारतात परतली. लवकरच मृणाल स्टार प्रवाहावरील एका मालिकेत दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी मृणाल आणि तिचा पती नीरज यांची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात ते त्यांच्यामधील नात्याबद्दल बोलताना दिसतायत. लॉन्ग डिस्टंस असूनही त्यांनी त्यांचं नातं कसं जपलं याबद्दलही ते बोलले आहेत.
नीरज आणि मृणाल यांनी दिवाळीनिमित्त लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना नीरज म्हणाला, 'एकतर आम्ही असे ५- ६ महिन्यांनी भेटायचोच. कधी मी इकडे यायचो तर कधी ती तिकडे यायची. ते आम्ही मॅनेज केलेलं. त्यात वॉट्सअँप आणि फेसटाइम तेव्हा होता. आमचा कंटिन्यू फेसटाइम सुरू असायचा. मी मिटिंगला बसलेलो असलो तरीही ते सुरू असायचं. माझ्याकडे सकाळ झाली की तिकडे रात्र होती. मग मी झोपताना आणि ती झोपताना आमचा कॉल असायचाच. फोनमुळे आम्हाला जास्त मदत झाली. आम्ही कनेक्टेड राहू शकलो.'
पुढे मृणाल म्हणाली, 'समजूतदार नवरा तू म्हणालीस ना तर आमच्या दोघांमध्ये तोच खरं समजूतदार आहे. त्याने मला खूप समजून घेतलं. कारण आपलं फिल्ड असं आहे की खूप शंका येणं, थोडंसं पझेसिव्ह होणं साहजिक आहे आणि ते अगदीच होऊ शकतं आणि आमच्यात एवढं अंतर होतं सात समुद्र पलीकडे वगरे. पण मला आतापर्यंत त्याने एकदाही असा प्रश्न विचारला नाही की हे कोण आहेत ते कोण आहेत. किंवा त्याने माझा फोन कधी चेक केला नाही. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी म्हणते ना काही गोष्टी या लकीली मिळतात. तसा हा आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.